‘गोऱ्या गोऱ्या गालावरी!’, म्हणत अभिनेत्री संस्कृती बालगुडेने लोकप्रिय गाण्यावर धरला ताल; चाहत्यांनाही भावल्या तिच्या अदा

marathi actress sanskruti balgude dancing on famous marathi song navari aali


सगळेच चित्रपट न स्वीकारता अगदी निवडक चित्रपट करणारी अभिनेत्री आहे, मराठमोळी संस्कृती बालगुडे. तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. कितीही अवघड भूमिका असुद्या, संस्कृती तिला अगदी सहजतेने पार पाडते. तिच्या याच अंदाजामुळे तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती दरदिवशी तिचे फोटोशूट नाहीतर मग व्हिडिओ शेअर करते. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टला खूप प्रेम मिळते.

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रिय राहणे पसंत करते. अलीकडेच तिने शेअर केले तिचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक हा एक डान्स व्हिडिओ आहे, जो अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

संस्कृतीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, ती ‘नवरी आली’ या लोकप्रिय गाण्यावर ताल धरताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिची नृत्य कला सादर केली आहे. यातील तिचा अभिनय आणि स्टेप्स अगदी पाहण्यासारख्या आहेत. संस्कृतीचे एक्सप्रेशन्स पाहून तर कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल.

हा डान्स व्हिडिओ शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गोऱ्या गोऱ्या गालावरी! काही गाणी कधीच जुनी होत नाहीत.” अवघ्या १ मिनिट २४ सेकंदाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. यामुळेच व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत, अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के असे कलाकार काम करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.