करीना कपूरने शेअर केला मुलगा तैमूरचा व्हिडिओ; समुद्रकिनारी मस्ती करताना दिसला छोटा नवाब

Actress Kareena Kapoor Khan Shares Son Taimur Ali Khan Special Video On World Environment Day


बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणजेच करीना कपूर खान सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असते. मात्र, सध्या आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ती थोडी व्यस्त आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा वावर थोडा कमी असतो. मात्र, असे असले तरीही ती चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी आपल्या फोटोसोबतच मुलगा तैमूर अली खान आणि पती सैफ अली खानचाही फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तैमूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

छोटा नवाब तैमूर अली खानच्या फोटोंचा समावेश असलेला हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडल्याचे दिसत आहे. यात तैमूर समुद्रकिनारी पायात काहीही न घालता मस्ती करताना दिसत आहे. सोबतच तो मातीतही खेळताना दिसत आहे. तैमूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तैमूरने टॉम एँड जेरी प्रिंट असलेला शर्ट घातला आहे. तैमूरला तुम्ही मातीचे पॅलेस बनवतानाही पाहू शकता.

करीनाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुलाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तैमूरच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून पसंती मिळत आहे. व्हिडिओ शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये “#प्रोटेक्ट, हील, लव्ह. जागतिक पर्यावरण दिवस,” असे लिहिले आहे.

यापूर्वी जागतिक पृथ्वी दिनानिमित्तही करीनाने तैमूरचा हटके फोटो शेअर केला होता. त्यात तैमूरसोबत वडील सैफ अली खानही दिसला होता. दोघेही हातात शेतात काम करताना दिसले होते.

अशा खास प्रसंगी करीना तैमूरचे फोटो नक्कीच शेअर करत असते. मात्र, अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या मुलाचा फोटो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मातृदिनानिमित्त करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नव्हता.

करीना शेवटची ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत दिवंगत अभिनेता इरफान खानचाही समावेश होता. याव्यतिरिक्त आता ती आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.