×

शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

भोजपुरी गायिका शिल्पी राज हिची एका नंतर एक गाणी प्रदर्शित होत आहे. या गाण्यांनी भोजपुरी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. यातच तिच्या आणखी एका नवीन गाण्याची भर पडली आहे. शिल्पी राजचे नवीन ‘कमरिया जमके हिला’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तिचे हे गाणे यूट्यूबवर वेगाने व्हायरल होत आहे. खूप जास्त संख्येने हे गाणे पाहिले जात आहे.

शिल्पीची गाणी खूप गाजतात. मस्तीची गाणी असो किंवा भावनिक गाणी असो सगळी गाणी जोरदार व्हायरल होत असतात. तिच्या या नवीन गाण्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या या व्हिडिओ साँगमध्ये अभिनेत्री तोषी द्विवेदी जोरदार ठुमके मारताना दिसत आहे. या गाण्यामध्ये तिने काळया रंगाचा चमकदार लेहंगा परिधान केला आहे. हे गाणे प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे.

निषाद फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलने या गाण्याला प्रदर्शित केले आहे. केवळ एका दिवसातच या गाण्याला 3 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचे बोल पवन तनय यांनी लिहिले आहेत तर सरगम स्टुडिओमध्ये या गाण्याला संगीत दिले आहे.

काही दिवसांपूर्वी शिल्पी राज आणि गोलू पाठक यांचे ‘जा हमके भुला जईह’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला देखील प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. या सोबतच शिल्पीचे ‘मलदाहावा आम’ हे गाणे देखील चांगलेच व्हायरल झाले होते. शिल्पी राजची गाणी खूपच गाजत आहे. ती आता दिग्गज कलाकारांना टक्कर देताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बादशाहच्या ‘पानी पानी’ गाण्याला ‘तारक मेहता…’च्या बापूजींचा तडका; पाहून तुम्हीही खदखदून हसाल

-पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर जया बच्चन यांनी म्हटले होते ‘असे’ काही; ऐकून ऐश्वर्या लागली होती रडू

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

Latest Post