×

बादशाहच्या ‘पानी पानी’ गाण्याला ‘तारक मेहता…’च्या बापूजींचा तडका; पाहून तुम्हीही खदखदून हसाल

गाणे बॉलिवूडमधील असो किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील यावर आपल्याला नेहमी रील्स आणि एडिट व्हिडिओ बनवलेले पाहायला मिळतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे नाव ‘पानी पानी’ असे आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासूनच यावर रील्स आणि एडिट व्हिडिओंचा पाऊस पडत आहे. या गाण्याचा वापर बॅकग्राऊंडला करून बनवलेला एक एडिटेड व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील बापूजी दिसत आहेत.

जेव्हा बापूजींनी घेतली एन्ट्री
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. हा व्हिडिओ स्वत: बादशाहने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या क्लिपच्या सुरुवातीला बादशाह आणि जॅकलिन फर्नांडिस हे दोघे दिसतात. मात्र, जसे गाण्यात पाण्याची ओळ येते, तेव्हा ‘तारक महता का उल्टा चष्मा’मधील बापूजी दिसतात. यात सोढीने पाण्याचा नळ चालू करताच पाण्याची धार बापूजींच्या अंगावर जाते. त्यामुळे ते थेट भिंतीला जाऊन धडकतात.

https://www.instagram.com/p/CQL6F4AAJq5/?utm_source=ig_web_copy_link

जेठालालने वाचवला होता जीव
पाण्याच्या वेगवान धारेपासून जेठालाल बापूजींना वाचवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे. यावेळी तो ओरडून म्हणतो की, “अरे बंद कर बंद कर.” यासोबतच व्हिडिओ क्लिप संपते. हा खूपच छोटी व्हिडिओ क्लिप आहे. मात्र, अशाप्रकारे बादशाहच्या गाण्यात बापूजींची झालेली एन्ट्री चाहत्यांना भलतीच आवडली आहे. स्वत: जॅकलिन आणि बादशाहने हसणाऱ्या इमोजीचा वापर करून कमेंट केली आहे.

कुठे झाली गाण्याची शूटिंग
बादशाह आणि जॅकलिनच्या या गाण्याची शूटिंग राजस्थानमध्ये झाली आहे. या गाण्यासोबत याचा व्हिडिओही खूपच पसंत केला जात आहे. या गाण्याला यूट्यूबवर ७२ मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याव्यतिरिक्त १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स आणि ८० हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने शोधली कोरोना लस घेण्याची नवीन पद्धत; एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट

Latest Post