×

पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर जया बच्चन यांनी म्हटले होते ‘असे’ काही; ऐकून ऐश्वर्या लागली होती रडू

सासू- सुनेचे नाते हे जगातील सर्वात किचकट नाते आहे. परिस्थिती, वेळ आणि काळानुसार बदलणाऱ्या या नात्यात अनेक पैलू असतात. भांडण, राग, प्रेम, माया आदी सर्व भावनांचे मिश्रण या नात्यात असते. सासू- सुनेचे नाते म्हटले की, डोळ्यासमोर येतात त्या सुनेचा छळ करणाऱ्या, त्रास देणाऱ्या टिपिकल सासवा. मात्र, जसा काळ बदलला तसे हे नाते देखील बदलले. आजच्या काळातील सासू आणि सून हे नाते आई- मुलीच्या नात्याइतकेच जिव्हाळ्याचे झाले आहे. मात्र, याला देखील अपवाद आहेच. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये देखील सासू सुनेच्या नात्याचे विविध उदाहरण पाहायला मिळतात. मात्र, मीडियामध्ये किंवा सोशल मीडियावर जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाते विशेष लोकप्रिय आणि चर्चेचा विषय असतो.

जया बच्चन या जरा संतापी स्वभावाच्या असल्याने अनेकदा या दोघींमध्ये आलबेल नसल्याच्या बऱ्याच बातम्या आपल्या कानावर येत असतात. घरातल्या अनेक मंडळींनी या दोघींमध्ये सर्व सुरळीत असल्याचे सांगितले, तरीही या चर्चा काही थांबत नाहीत. मात्र, आता या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये जया बच्चन या त्यांच्या सुनेची तोंडभरून स्तुती करताना आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण जगासमोर सासूच्या तोंडून होणारे कौतुक ऐकून ऐश्वर्या देखील भावनिक झालेली आहे. या २००७ च्या व्हिडिओमध्ये जया बच्चन एका पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसत असून ऐश्वर्याचे कौतुक करत आहे. त्या म्हणत आहेत की, “आज मी एका अशा मुलीची सासू होणार आहे, जी खूप चांगली आणि सुंदर आहे. जिचा संपूर्ण जगात एक गौरव मान सन्मान असून, तिचे हास्य खूपच सुंदर आहे. तुझे परिवारात मनापासून स्वागत आणि खूप प्रेम.”

जया बच्चन यांच्या तोंडून हे ऐकून ऐश्वर्याला देखील भरून आले आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. मीडियामध्ये अनेकदा जया आणि ऐश्वर्या यांच्यातील मतभेदांवर येणाऱ्या बातम्यांना हा व्हिडिओ एक उत्तरच आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Rai (@lovely_aishwarya)

अभिषेकने देखील सांगितले आहे की, जया आणि ऐश्वर्या यांचे नाते चांगले आहे. “या दोघी जेव्हा माझ्यावर चिडतात तेव्हा दोघीही बंगालीमध्ये बोलतात. ऐश्वर्या रितुपर्णो घोष यांच्या ‘चोखेर बाली’ या सिनेमासाठी बंगाली भाषा शिकली होती. त्यामुळे या दोघी एका टीममध्ये जाऊन मला वेगळे करतात,” असे अभिषेक म्हणाला होता.

ऐश्वर्याने सन १९९७ मध्ये आलेल्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने एकापेक्षा एक चित्रपट बॉलिवूडला दिले. यात ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मोहब्बतें’, ‘देवदास’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने शोधली कोरोना लस घेण्याची नवीन पद्धत; एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट

-‘मलाही दाखवा माझा बंगला’, आलिशान बंगल्याची अफवा पसरल्यावर खुद्द ‘जेठालाल’ने केला होता खुलासा

Latest Post