Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हिंदी गाण्यांची कॉपी करून बनवलेली ‘ही’ भोजपुरी गाणी झाली आहेत सुपरहिट

अनेक प्रकारची गाणी ऐकली जातात, पण भोजपुरी गाण्यांना वेगळा दर्जा आहे. गेल्या काही वर्षांत या इंडस्ट्रीत बरेच बदल झाले आहेत. आता भोजपुरी इंडस्ट्रीत गाण्यांवर मोठी गुंतवणूक केली जात आहे. बदलत्या काळानुसार भोजपुरी इंडस्ट्रीत एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमुळे बॉलिवूड गाण्यांची कॉपी करून भोजपुरी गाणी बनवली आहेत. हिंदी गाण्यांची कॉपी करण्याच्या बाबतीत भोजपुरी इंडस्ट्री किती यशस्वी ठरली ते जाणून घेऊया.

पानी पानी

बादशाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या ‘पानी पानी’ या गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. गाण्याची लोकप्रियता पाहून खेसारी लाल यादवने अक्षरा सिंगसोबत त्याचे भोजपुरी व्हर्जन बनवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खेसारी लाल आणि अक्षरा सिंगची ही जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली, म्हणजेच हे गाणे हिट ठरले.

लूट गये

इमरान हाश्मीच्या ‘लूट गये’ या सुपर-डुपर हिट गाण्याचे भोजपुरी व्हर्जनही तयार करण्यात आले आहे. ‘लूट गये’च्या भोजपुरी व्हर्जनचा गायक पवन सिंग आहे. ज्याने हे गाणे अशा पद्धतीने गायले आहे की, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकायला भाग पडेल.

बारिश बन जाना

हिना खान आणि शाहीर शेख स्टारर ‘बारिश बन जाना’ या गाण्याने प्रदर्शित होताच खळबळ उडवून दिली. हिंदी गाणे हिट झाले, त्यामुळे पवन सिंगला त्याचे भोजपुरी व्हर्जन करायचे होते. चांगली गोष्ट म्हणजे तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला. पवन सिंग आणि पायल देव यांच्या आवाजात गायलेले ‘बारिश बन जाना’ चे भोजपुरी व्हर्जन देखील चाहत्यांना खूप आवडले होते.

परदेसिया

खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) यांचे ‘परदेसिया’ हे गाणेही हिंदी गाण्याची कॉपी आहे. जे शिल्पी राजच्या साथीने खेसारी लाल यांनी गायले आहे. मात्र, मूळ गाण्याइतके हे भोजपुरी गाणे पसंत केले गेले नाही.

मेरे रश्के कमर

‘बादशाहो’चे हे गाणे जेव्हा-जेव्हा कानावर पडते. तेव्हा मन रोमँटिक बनते. हिंदी गाण्याची लोकप्रियता पाहून पवन सिंगने त्याचे भोजपुरी व्हर्जन काढले. हिंदी गाण्याप्रमाणेच ‘मेरे रश्के कमर’चे (Mere Rashke Qamar) भोजपुरी व्हर्जनही हिट झाले आहे.

तुमसा कोई प्यारा

जर ९० च्या दशकातील सदाबहार गाण्यांबद्दल बोलायचे झाले, तर ‘खुद्दार’ चित्रपटातील ‘तुमसा कोई प्यारा’ हे गाणे लोकांच्या ओठावर नक्कीच येईल. तसे या हिंदी गाण्याचे भोजपुरी व्हर्जनही तयार झाले आहे. ‘हिट है फ्लॉप’ हे गाणे ऐकून तुम्हीच या गाण्याबद्दल तुमचे मत नोंदवू शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा