‘साथ निभाना साथिया’मधील ‘कोकिला मोदी’ रुग्णालयात दाखल; पतीने दिली तब्येतीची माहिती


टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘साथ निभाना साथिया’ होय. आता या मालिकेतील एका कलाकाराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. या मालिकेत गोपीच्या सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपल पटेलबाबत ही बातमी आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, रुपल पटेल यांनी नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

असे असले, तरीही त्यांना कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल केले होते, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता त्यांचे पती राधाकृष्ण दत्त यांनी या वृत्तावर रुपल आता ठीक असून चिंता करण्याची कोणतीही बाब नसल्याचे म्हटले आहे. (TV Serial Saath Nibhaana Saathiya Fame Actress Rupal Patel Hospitalised Her Husband Give Update On Her Health)

चाहत्यांनी केली रुपल ठीक होण्यासाठी केली प्रार्थना
रुपल पटेल यांना रुग्णालयात दाखल होण्याचे वृत्त जसे चाहत्यांनी मिळाले, त्यानंतर लगेच अभिनेत्रीच्या चाहत्यांनी त्या ठीक होण्यासाठी प्रार्थना केली. रुपल पटेल हे टीव्हीवरील मोठं नाव आहे. त्यांची टीव्हीवरील दमदार महिलेची भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडते.

‘साथ निभाना साथिया’ने दिली वेगळी ओळख
रुपल पटेल यांनी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, त्यांना खरी ओळख ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून मिळाली. या शोमुळे त्या घराघरात पोहोचल्या. या मालिकेत त्यांनी गोपीच्या कठोर सासूची भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांचे नाव कोकिला मोदी होते. हे पात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप होते.

काही महिन्यांपूर्वी मालिकेशी संबंधित रुपल यांचा एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे हा व्हिडिओ अभिनेत्री आणि सध्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत कोकिला आपली सून गोपीला ओरडताना दिसत होती.

रसोड़े में कौन था व्हिडिओ झाला होता व्हायरल
‘साथ निभाना साथिया’मधील व्हायरल झालेला व्हिडिओ म्युझिक कंपोजर यशराज मुखातेने रँप साँगप्रमाणे तयार केला होता. या व्हिडिओत यशराजने मालिकेतील किचनमधील एक सीन म्युझिकसोबत जोडून त्याचे रिमिक्स बनवले होते. या व्हिडिओत कोकिला मोदी म्हणजेच रुपल पटेलव्यतिरिक्त तिची सून गोपी आणि राशीदेखील दिसत होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

या मालिकेच्या पहिल्या सिझनला मिळालेले यश पाहून निर्माते मालिकेचा दुसऱ्या सिझन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले होते. यामध्ये रुपल पटेल यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, दुसरा सिझन प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला.

त्यांनी ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेनंतर ‘मनमोहिनी’ आणि ‘ये रिश्ते हैं प्यार के’ यांसारख्या अनेक मालिकेत काम केले आहे. सन २०२० मध्ये रुपल ‘गँग्स ऑफ फिल्मिस्तान’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकल्या होत्या.


Leave A Reply

Your email address will not be published.