माय-लेकाच्या जोडीचा धमाल डान्स व्हायरल; किशोरी शहाणे यांनी शेअर केला व्हिडिओ


मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यांनी त्यांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटातील त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांसमोर सादर केल्या. त्या आता छोट्या पडद्यावरील ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. याशिवाय किशोरी सोशल मीडियावर सक्रिय राहून, त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.

नुकताच किशोरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या त्यांच्या मुलासोबत थिरकताना दिसल्या आहेत. यात ही माय लेकाची जोडी ‘कोंबडी पळाली’ या लोकप्रिय गाण्यावर अतिशय दिलखुलास अंदाजात ठुमके लावत आहे. यातील त्यांच्या डान्स स्टेप्स आणि म्हूव्ज अगदी पाहण्यासारखे आहे. विशेष म्हणजे किशोरी यांनी प्रथमच मुलासोबतचा रील व्हिडिओ शेअर केला आहे.

किशोरी यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “माझ्या मुलासोबत पहिली रील.” चाहत्यांना देखील ही माय लेकाची रिअल केमिस्ट्री चांगलीच भावली आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अवघ्या काही तासातच यावर ६ हजाराहून अधिक लाईक्स आल्याचे पाहायला मिळत आहे. (kishori shahane and her son dancing on kombadi palali song take a look)

किशोरी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी बऱ्याच हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या समवेत भूमिका असलेल्या ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. तसेच ‘शिर्डी साईबाबा’ याद्वारे त्यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केले होते. याशिवाय किशोरी चित्रपट निर्मात्या देखील आहेत. २०१९ साली कलर्स मराठी चॅनलवरील ‘बिग बॉस’ मराठी रियालिटी शोमधील सहभागामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.