Sunday, April 14, 2024

तोबा तोबा! १० कोटी लोकांनी पाहिलेल्या ‘या’ गाण्यात काय आहे खास? तरुणाईला खूपच आवडलंय गाणं

भोजपुरी सिनेसृष्टीतील कलाकारांची गाणी ही प्रेक्षकांच्या जीभेवर लवकर रुळणारी असतात. त्यामुळेच, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच भोजपुरी गाणी आवडतात. काही गाणी अशी असतात, जी देशभरात व्हायरल होतात. प्रसिद्ध गायक आणि भोजपुरी स्टार प्रमोद प्रेमी यादव हा तरुणांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याची लोकप्रियता ही वाढतच आहे. त्याचे गाणेही इतर कलाकारांच्या गाण्यांप्रमाणे सोशल मीडियावर राडा करतात. तो त्याच्या प्रेक्षकांसाठी ट्रेंडिंग विषयांवरील व्हिडिओ बनवत असतो. अशात त्याचे एक जुने गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

सध्या प्रमोद प्रेमी यादव (Pramod Premi Yadav) याचे एक गाणे खूपच धमाल करत आहे. या गाण्याने प्रदर्शित होताच सर्वांना नाचायला भाग पाडले होते. या गाण्याने अवघ्या ६ तासात १० लाख व्ह्यूजचा टप्पा पार करत भोजपुरी संगीतक्षेत्रातील सर्व विक्रम मोडीत काढले होते. आताही हे गाणे चांगलेच गाजत आहे. नुकतेच या गाण्याने १०० मिलियन म्हणजेच १० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. या गाण्याचे व्ह्यूज क्षणाक्षणाला वाढत आहेत.

प्रमोद प्रेमी यादव याच्या या गाण्याचे नाव ‘लोईया काटता गाल हिले’ असे आहे. हे गाणे ३१ जुलै, २०२२ रोजी वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला आतापर्यंत १० कोटी ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

प्रमोद प्रेमीसोबत ‘या’ अभिनेत्रीने लावले ठुमके
या गाण्यात प्रमोद प्रेमी याच्यासोबत प्रियांका राय (Priyanka Rai) ही जोरदार ठुमके लावताना दिसत आहे. प्रियांकाच्या कातील अदांनी तरुणाईला भुरळ घातली आहे. चाहत्यांना या दोघांचीही केमिस्ट्री खूपच आवडताना दिसत आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालताना दिसत आहेत.

गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणणारी टीम
या गाण्याबद्दल बोलायचं झालं, तर या गाण्याचे बोल कृष्णा बेदर्दी यांनी लिहिले आहेत. या गाण्याला शशिरंजन यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन अभय रंजन यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘…मी माफी मागतो’, आलियाला वाढत्या वजनावरून चिडवून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रणबीर; आता मागितली माफी
दाऊदची एक्स गर्लफ्रेंड बॉयकॉट ट्रेंडवर बरळली; म्हणाली, ‘या सगळ्याला कारणीभूत बॉलिवूड कलाकारांचा राग’
चाहत्यांसाठी खुशखबर! कार्तिक आर्यन आणि रश्मिकाची जोडी करणार एकत्र काम

हे देखील वाचा