भोजपुरी वेंडिंग साँग ‘बाबुल की शिक्षा’ रिलीझ; आई- वडील अन् मुलीचे नाते जोडून ठेवणारे गाणे


भोजपुरी चित्रपटसृष्टीतील चित्रपट जेवढे प्रसिद्ध होतात, तेवढीच प्रसिद्ध असतात यातील गाणी. भोजपुरीमध्ये दरदिवशी अनेक गाणी प्रदर्शित होत असतात. प्रेक्षकांना देखील ही गाणी खूप आवडतात. अशातच भोजपुरी मधील एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विवाह स्पेशल ‘बाबुल की शिक्षा’ हे गाणे शनिवारी (12 जून) प्रदर्शित झाले आहे.

हे गाणे सामाजिक आणि कौटुंबिक भोजपुरी गीतांना एका रूपात आणणारी म्युझिक कंपनी विजय लक्ष्मी भोजपुरी ट्यूनने बनवले आहे. या गाण्याला यूट्यूबवर खूप पसंती मिळत आहे. हे गाणे लग्न विशेष आहे. तसेच या गाण्यातून एक संदेश देखील दिला जात आहे.

या म्युझिक व्हिडिओमध्ये लग्नाच्या वेळी आई- वडिलांकडून त्यांच्या मुलीला जो संदेश मिळतो. यावर ती मुलगी जे वचन देते, ते ती पूर्णपणे पार पाडते हे दाखवले आहे. आई- वडील आणि एका मुलीमधील प्रेम पाहून कोणाचेही मन भरून येईल. प्रत्येक घरातील आई- वडील आणि मुलीला हे जोडून ठेवणारे गाणे आहे. प्रेक्षकांनी या गाण्याला खूप पसंती दर्शवली आहे.

लग्न विशेष गाणे ‘बाबुल की शिक्षा’ या गाण्याच्या आधी विजय लक्ष्मी म्युझिकने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘बाबुल की शिक्षा’ या सुंदर गाण्याला काजल श्री हीने गायले आहे. तिचे असे म्हणणे आहे की, हे गाणे तिच्या हृदयाच्या अगदी जवळचे आहे. “या गाण्यामध्ये आपल्या देशातील वैवाहिक संस्कार आणि चालीरीती आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, सगळेजण या गाण्याला खूप प्रेम आणि आशीर्वाद देतील. कारण हे गाणे कुठे ना कुठे सर्वांशी निगडित आहे.” या गाण्याचे संगीत देखील खूप सुंदर आहे.

या गाण्याचे बोल रवी चोप्रा यांनी लिहिले आहे. प्रितांश सिंग यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे पीआरओ रंजन सिन्हा हे आहेत. दिग्दर्शक रणजित कुमार सिंग आणि एडिटर प्रशांत कुमार सिंग हे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

-‘इंडियन आयडल १२’मध्ये ‘मेरे रश्के कमर’ गाणं गायल्याने सोनू कक्कर ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘मूळ गाण्याची…’

-या चिमुकलीला ओळखलं का? आज तिच्या ‘कॉमिक टायमिंग’साठी आहे प्रसिद्ध; तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला पाडते भाग


Leave A Reply

Your email address will not be published.