रश्मी देसाईने स्टेजवर लावले ‘या’ गाण्यावर ठुमके, गोविंदासह अनेक स्टारने टाळ्यांच्या कडकडात केले कौतूक


‘उतरन’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या नवनव्या व्हिडीओने सर्वांना वेड लावत आहे. तिचे चाहते तिला नेहमी भरभरून प्रेम देतात. यामुळे तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. रश्मीने टीव्ही मालिकांसोबतच भोजपुरी सिनेमांतही बरीच कामे केली आहेत आणि तिची फॅन फॉलोइंगही तिथे खूप आहे.

नुकतेच रश्मीने शेअर केलेला तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती एका ‍अवॉर्ड शोमध्ये नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मी ‘हमके जोगन बना दिहले बाड़ा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

निळ्या लेहेंग्यामधील रश्मीच्या या परफॉर्मेंसने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इतकेच नव्हे तर प्रेक्षकांमध्ये बसलेले सुपरस्टार गोविंदा आणि शत्रुघ्न सिन्हाही तिच्या डान्सची प्रशंसा करताना दिसले. व्हिडिओमध्ये गोविंदा टाळ्या वाजवतानाही दिसला आहे.

रश्मी देसाई अभिनय आणि डान्सव्यतिरिक्त तिच्या ग्लॅमरस लुकमुळे बर्‍याचदा चर्चेचा विषय राहिली आहे. चाहते तिच्या फोटोला सोशल मीडियावर नेहमी चांगला प्रतिसाद देत असतात. ‘उतरन’ व्यतिरिक्त रश्मी ‘दिल से दिल तक’ आणि ‘नागीन-4’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच रश्मी ‘बिग बॉस -13’ चाही भाग राहिली आहे. टेलिव्हिजनवर काम करण्यापूर्वी ती अनेक बी-ग्रेड चित्रपटांमध्ये देखील दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-
डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा कशी दिसते मिथुन यांच्या सुनबाई
एकेकाळी दीड हजारात डान्स शो करणारी  आंख्या का काजल  आज बनलीये कोट्यधीश
नोरा फतेहीचा  साकी साकी गाण्यावर एकदम कडक डान्स, पाहून चाहतेही झाले खुश
धनश्री वर्माने केला आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून पती युझवेंद्र चहलची मन जिंकणारी कमेंट

दिया और बातीच्या संध्याचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल, वेस्टर्न लूकमध्ये या गाण्यावर केलाय डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.