डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा कशी दिसते मिथुन यांच्या सुनबाई


बॉलिवूड सुपरस्टार ‘मिथून चक्रवर्ती’ यांची सून ‘मदलसा शर्मा’ ही आजकाल सोशल मीडियावर खूपच सक्रिय दिसते. तिचे एका पेक्षा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत. ती दररोज एखादा फोटो किंवा व्हिडिओ तिच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.

मदालसा शर्माने नुकतेच एक फोटोशूट केले आहे आणि ते फोटोज् तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते फोटोज् प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मादलसाचे हे फोटो इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये मदालसा एका झाडाच्या शेजारी उभी राहून पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये देखील ती नेहमी प्रमाणेच सुंदर दिसत आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी सूनबाई मदालसा शर्मा हीच्या फोटोजला तिचे चाहते खूपच लाईक्स आणि कमेंट करत आहे. तसेच तिला प्रेक्षकांकडून देखील खूप प्रेम मिळत आहे. या फोटोंनी आतापर्यंत हजारो लाईक्सचा टप्पा पार केला आहे. मदालसा ही आता टीव्हीवर ‘स्टार प्लस’ या चॅनलवर चालू असणाऱ्या अनुपमा हा शोमध्ये काम करत आहे. यामध्ये ती काव्या झावेरी हीच पात्र निभावत आहे. मदालसा शर्मा हिने मिथुन चक्रवर्ती ह्यांचा मुलगा ‘मिमोह चक्रवर्ती’ ह्याच्या सोबत लग्न केले आहे. मदालसा ही एक नावजलेली अभिनेत्री आहे. तिने तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे. आणि तिथे देखील नाव कमावले आहे.

मदालसा शर्मा ही अभिनेत्री शीला शर्मा आणि दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. मदालसाची आई शीला शर्मा हिने 90 व्या शतकात महाभारतात देवकीच पात्र साकारलं होतं. मदालसा आणि मिमोह यांचं लग्न जुलै 2018 मध्ये झाले आहे. मादलासंने 2009 मध्ये ‘फिट्टींग ‘या तेलगू चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या व्यतीरिक्त तिने ‘शौर्य’ या कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.