नोरा फतेहीचा ‘साकी साकी’ गाण्यावर एकदम कडक डान्स, पाहून चाहतेही झाले खुश

Bollywood Actress And Dancer Nora Fatehi On Saki Saki Song Video Viral On Internet


बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर ‘नोरा फतेही’ ही आपल्या डान्समुळे प्रेक्षकांचे मन जिंकण्यात कधीच मागे पडत नाही. तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर येत्या क्षणीच व्हायरल होतो. प्रेक्षक देखील या व्हिडिओला खूप प्रेम देतात, लाखो लाईक्सचा वर्षाव करतात. नोरा फतेहीचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ‘साकी साकी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स मूव्स करत आहे. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच सोशल मीडियावर खूप धमाल करत आहे.

नोरा फतेहीचा हा डान्स व्हिडिओ ‘फिल्मीज्ञान’ या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर तिचे चाहते खूप लाईक्स आणि कमेंट करत आहेत. नोराचे हे गाणे आले, तेव्हा देखील खूप लोकप्रिय झाले होते. प्रेक्षकांनी तर अगदी या गाण्याचे बोल डोक्यावर घेतले होते. जो तो फक्त हे गाणे म्हणत होता. या व्हिडिओमधील नोराच्या डान्स स्टेप्स देखील खूप गाजल्या होत्या. परंतु अगदी काही वर्षानंतर जेव्हा या गाण्याचा व्हिडिओ परत पाहिला, तेव्हा त्यांच्या उत्साहाला उधाण आले आणि सगळे खूपच खुश दिसत आहे.

नुकतेच नोरा फतेही हिचे ‘छोड देंगे’ हे गाणे सुद्धा सोशल मीडियावर खूप धमाल करत आहे. या गाण्याला देखील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. या गाण्याला आतापर्यंत 60 मिलियन पेक्षाही जास्त वेळा बघितले गेले आहे. या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या गाण्याच्या लिरिक्स सोबतच नोराचा डान्स देखील खूप कमालीचा आहे.

या आधी नोरा हिचा ‘नाच मेरी राणी’ हा डान्स व्हिडिओ देखील प्रदर्शित झाला होता. यामध्ये ती पंजाबी सिंगर ‘गुरु रंधवा’ याच्या सोबत दिसत आहे. या गाण्याने देखील सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घातला होता. तसेच प्रेक्षकांना नाचण्यासाठी प्रवृत्त केले होते. केवळ भारतातच नाही, तर अनेक परप्रांतीयांनी देखील या व्हिडिओला खूप पसंती दाखवली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.