Tuesday, July 9, 2024

‘मच्छरिया’ गाण्याची सोशल मीडियावर धमाल; ६ दिवसांत मिळाले ५० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

भोजपुरी गाण्यांचा सध्या सोशल मीडियावर जलवा आहे. अनेक गाण्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हायरल होणाऱ्या गाण्यांमध्ये भोजपुरी सुपरस्टार ‘खेसारी लाल यादव’च्या ‘बाप जी’ या सिनेमातील ‘मच्छरिया’ या गाण्याचाही समावेश आहे. हे गाणं चांगलीच धमाल करत आहे. प्रेक्षकांकडूनही गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे गाणं 28 जानेवारी 2021 ला रिलीझ करण्यात आले होते. हे गाणे आतापर्यंत ५० लाखांपेक्षाही अधिक वेळा पाहिले गेले आहे.

हे गाणं ‘खेसारी लाल यादव’ आणि ‘काजल राघवानी’ यांच्यावर चित्रित केले आहे. या गाण्यात त्यांचे लूक आणि ड्रेस खूपच‌ आकर्षक आहेत. हे गाणं ‘खेसारी लाल यादव’ आणि ‘खुशबू तिवारी केटी’ यांनी मिळून गायले आहे.

‘बाप जी’ या सिनेमाचा ट्रेलर आताच वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ झाला आहे. या सिनेमात मुलाच्या भूमिकेत स्वतः ‘खेसारी लाल यादव’ आणि पित्याच्या भूमिकेत ‘मनोज टायगर’ हे आहेत. या चित्रपटात त्यांची केमेस्ट्री खूपच मनोरंजक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच माहिती होतंय की, हा चित्रपट सर्व पेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक देव पांडे यांनी या सिनेमाची स्टोरी चांगल्या प्रकारे पडद्यावर मांडली आहे.

या सिनेमाचे निर्माते ‘रामजी जयस्वाल (गोविंदा)’ आणि सहनिर्माते ‘शामजीत बरई’ हे आहेत. ‘ओम झा’ हे संगीतकार, तर गीतकार आझाद सिंह, प्यारे लाल यादव, यादव राज आणि कुंदन प्रीत हे आहेत. या सिनेमाचे लेखक अरविंद तिवारी हे आहेत. तसेच एडिटर गुरजंट सिंग, अँक्शन मास्टर एस मलेश, डान्स मास्टर रिक्की गुप्ता, कला निर्देशक सतीश गिरी, कार्यकारी निर्माता संतोष वर्मा आणि मार्केटिंग हेड विजय यादव हे आहेत.

या सिनेमात मुख्य भूमिकेत खेसरी लाल यादव, रितू सिंग, काजल राघवाणी, मनोज टायगर, प्रकाश जैस, रजबी र, रितू पांडे, सी पी भट्ट, संजय वर्मा हे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलम गिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, रिलीझ होताच मिळवलं प्रेक्षकांच्या मनात स्थान

तीन सुपरस्टारने एकत्र येत दिलंय सुप्पर डुप्पर हिट गाणं, बोल आहेत ‘धीरे धीरे बढी नजदिकिया, धीरे धीरे फ्रेन्ड गर्लफ्रेंड हो गयी’

विक्रमांचा विक्रम! भोजपुरी गायकाच्या गाण्याने केला विक्रम, तब्बल २५ कोटी हिट्स मिळवत केला नवा रेकॉर्ड

‘लाल साडी’ ने चाहते झाले घायाळ, सुपरस्टार रितेश पांडेचं गाणं यूट्यूबवर जोरदार व्हायरल

हे देखील वाचा