सध्या बरेच गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यांनी तमाम चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. त्यातच आता आणखी एक व्हिडिओची भर पडली आहे. ‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलम गिरी आणि भोजपुरी स्टार नीलकमल सिंग यांचा समावेश असलेलं गाणं ‘तकदीर के मारल’ भोजपुरी अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीझ केले आहे. या सॅड ऑडिओ गाण्याला मिळालेल्या यशानंतर या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नीलम आणि नीलकमल यांच्या सोबतच ‘आशुतोष तिवारी’ यांनी देखील यामध्ये प्रदर्शन केले आहे.
या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. हे गाणं आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. सोबतच याची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या गाण्याला ‘राज गाजीपुरी’ यांनी संगीत दिले आहे. तसेच गीतकार ‘अखिलेश बाबा’ यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर ‘रवी पंडित’ यांनी व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे. या व्हिडिओची कोरिओग्राफी ‘रीतिक आरा’ यांनी केली आहे. ‘दीपक पंडित’ यांनी एडिटिंग, तर ‘सोनी गाजीपुरी’ यांनी रेकॉर्डिंग केले आहे.
नीलम गिरी आणि नीलकमल सिंह यांचं ‘तकदीर के मारल’ हे भोजपुरी गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या गाण्याच्या चित्रिकरणावर खूपच पैसा खर्च केला आहे. या व्हिडिओची शूटिंग वेगवेगळ्या आणि रमणीय ठिकाणी केली गेली आहे. या गाण्याला बघून अस म्हटलं जातंय की, वर्ल्डवाईड रेकॉर्डस नेहमी प्रमाणेच या वेळी देखील भोजपुरी संगीताच्या जगात एक वेगळा बदल घडवून आणत आहे. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘लाल साडी’ ने चाहते झाले घायाळ, सुपरस्टार रितेश पांडेचं गाणं यूट्यूबवर जोरदार व्हायरल