×

Bhul Bhulaiya 2 | पुन्हा येतेय मंजुलिका! थरारक सीन्ससह कॉमेडी घेऊन रिलीझ झाला ट्रेलर

कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘भूल भुलैया २’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर चाहत्यांची नजर आहे आणि या प्रतिक्षेत आता चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. होय, कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये कार्तिक मंजुलिका नावाच्या भूतनीशी पंगा घेताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये कॉमेडीसोबतच हॉरर सीन्सचा टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एकूण ३ मिनिटे १६ सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात ‘आमी जे तोमार’ या लोकप्रिय गाण्याने होते, ज्यामुळे सुरुवातीलाच भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यानंतर एंट्री होते १५ वर्षांनी परतलेल्या मंजुलिकाची. मंजुलिका काळी जादू करण्यास सक्षम आहे. यानंतर कार्तिक आर्यन जबरदस्त एन्ट्री करतो, जो मंजुलिकाला पुन्हा कैद करण्यासाठी आला आहे. पण नंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे. ट्रेलरमध्ये कार्तिक आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani) लव्ह अँगल देखील दाखवण्यात आला आहे. (bhool bhulaiyaa 2 trailer out kartik aaryan tabu and kiara advani film)

ट्रेलरमध्ये एक ट्विस्टही दाखवण्यात आला आहे. जेव्हा कियारा अडवाणीला मंजुलिकाच्या रुपात पाहून कार्तिक आर्यन आश्चर्यचकित होतो. कियारा अडवाणीचे काही हॉरर सीन्सही दाखवण्यात आले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या मंजुलिका अवतारात दिसत आहे.

‘भूल भुलैया २’ याआधी २०२१ मध्ये रिलीझ होणार होता, पण कोरोनामुळे या सिनेमाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता ‘भूल भुलैया २’ २० मे २०२२ रोजी रिलीझ होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनशिवाय कियारा अडवाणी, राजपाल यादव (Rajpal Yadav), संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि तब्बू (Tabu) देखील दिसणार आहेत. त्याचवेळी अक्षय कुमार (Akshay Kumar), विद्या बालन (Vidya Balan), राजपाल यादव, अमिषा पटेल (Amisha Patel) शायनी आहुजा आणि परेश रावल (Paresh Rawal) ‘भूल भुलैया’मध्ये दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post