Tuesday, April 21, 2026
Home बॉलीवूड ‘आपण इतके स्वार्थी झालो की…’, विश्व प्रकृती संरक्षण दिनानिमित्त भूमी पेडणेकर झाली व्यक्त

‘आपण इतके स्वार्थी झालो की…’, विश्व प्रकृती संरक्षण दिनानिमित्त भूमी पेडणेकर झाली व्यक्त

मनुष्याने स्वतःचा विचार करत केवळ आणि केवळ स्वार्थासाठी निसर्गाने दिलेल्या वस्तूंचा गैरवापर केला किंवा त्या वस्तूंची किंमत न ठेवता पाहिजे तशी उधळपट्टी केली. माणूस त्याचा फायदा करण्याच्या नादात इतका आंधळा झाला की, तो निसर्गाचे आणि पर्यायाने स्वतःचेच नुकसान करत असल्याची जाणीव देखील त्याला झाली नाही. निसर्गाने अगदी मुबलक प्रमाणात आपल्याला जमीन, पाणी आणि जंगल दिले. मात्र आपण या तिन्ही गोष्टींचा केवळ अपव्यय केला. निसर्गाने आपल्याला जंगल, जमीन आणि पाणी याचे वरदान दिले होते, पण आज दुर्दैवाने आपल्याकडे या तिन्ही गोष्टींची कमतरता आहे. निसर्गाचे हे वरदान आज आपण आपल्याच कृतीमुळे श्रापात बदलावले आहे. माणसाच्या प्रगती (अधोगती) मुळे आज नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण देखील वाढले आहे. आज आपण विश्व प्रकृती संरक्षण दिवस साजरा करत आहोत. याच दिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री भूमी पेडणेकरने निसर्गाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावेळी भूमीने जे काही सांगितले ते खरंच विचार करण्यासारखे आहे. याआधी अनेकदा तिने तिच्या या विषयावरील विचार सर्वांसमोर ठेवले आहे. भूमी स्वतःच एक नेचर एक्टिविस्ट आहे.

एका चर्चेदरम्यान भूमीने सांगितले की, “आता आपण अशा ठिकाणी पोहचलो आहोत, जिथे सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिले, तर आपल्या लक्षात येईल अशा वातावरणाचा आपल्याला देखील त्रास होत आहे. जर्मनी, महाराष्ट्र, चीन मध्ये अचानक पूर येतो. अमेरिकेत दक्षिण आफ्रिकेत जंगलांना अचानक आग लागते, कॅनडामध्ये उष्ण लहर येते. हे पाहून आपल्या लक्षात आले पाहिजे की, आता गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. येणाऱ्या पिढीसाठी हे चित्र खूप गंभीर आहे. आजचा दिवस आपल्याला जाणीव करून देतो की, आता जे काही आपल्याकडे बाकी आहेत निदान ते तरी आपण जपले पाहिजे. येणाऱ्या पिढींसाठी हे आपले कर्तव्य आहे. सामान्य लोकांनी, राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वार्थात नेहमी विसरतो की आपण निसर्गाशी खेळत आहोत. ” (bhumi pednekar on world nature conservation day)

पुढे भूमी म्हणते की, “प्रकृतीच्या संरक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, लोकांना याबद्दल जागृत करण्याची गरज आहे. आता असे वाटते की लोकांनी यावर विचार करायला सुरुवात केली आहे. लोकांच्या विचारात बदल होत आहे. कोरोनाच्या काळाने आपल्याला निसर्गाचे भयावह रूप दाखवले आहे.”

याकारणांमुळे निसर्गाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे देखील तिने सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यूट्यूबवर ‘जालिमा कोका कोला’ गाण्याने केला राडा! नोरा फतेहीच्या डान्सने पुन्हा एकदा जिंकली प्रेक्षकांची मनं

-दीपिकाने अंगावर काटा आणणारा, भयावह व्हिडिओ केला शेअर; नेटकऱ्यांकडून आगामी चित्रपटाबद्दल लावला जातोय अंदाज

-व्हायरल व्हिडिओला प्रतिक्रिया देत, धर्मेंद्र यांनी नातू करण देओलचे केले कौतुक; म्हणाले, ‘तू तुझ्या पंजीसारखा…’

हे देखील वाचा