Monday, March 4, 2024

पत्रकार बनुन भुमी पेडणेकरने उतरवला समाजातील ‘भक्षका’चा मुखवटा,म्हणाली,’ या गोष्टी आयुष्याचा भाग… ‘

यशराज फिल्मसचा चित्रपट ‘दम लगागे हाइशा’ मधुन चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भुमी पेडणेकरचा नविन चित्रपट लवकरंच येणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. शाहरुख खानच्या(Shah rukh khan) प्रोडक्शन हाउसच्या ‘भक्षक’ चित्रपटात भुमी पेडणेकर प्रथमच पत्रकाराच्या भुमिकेत दिसणार आहे. भक्षक चित्रपट 2018 मध्ये समोर आलेल्या बिहारमधील मुजफ्फरपुर शेल्टर होम रेप च्या घटनेची आठवण करायला भाग पाडतो. इतकंच नाही तर या चित्रपटात देशात घडणाऱ्या अशा अनेक घटना दाखवल्या आहेत.

‘भक्षक ‘ चित्रपटात दमदार पत्रकाराची भुमिका भुमी(Bhumi Pednskar) निभावणार आहे.दरम्यान अभिनेत्री भुमी पेडणेकर म्हणाली,”यासारख्या घटना प्रत्येक दुसऱ्या दिवशी आपल्याला वर्तमान पत्रात पहायला मिळतात.ही एखाद्याच्या आयुष्याची गोष्ट आपल्यासाठी मात्र फक्त एक बातमी बनुन जाते. अशा मुलींसोबत या घटना घडत आहेत ज्यांच्या मागे पुढे कोणीही नाही.अशा गोष्टी माझ्या आयुष्याचा भाग आहेत. जेव्हा मी ‘सोनचिरैया’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये होते. तेव्हा मी चंबल मधील एका आश्रमाला दत्तक घेतलं होतं.त्या चित्रपटात खुशीची भुमिका पार पाडणारी मुलगी त्याच आश्रमातील आहे. मी मागच्या पाच वर्षांपासुन या क्षेत्रात काम करत आहे.”

‘दम लगाके हाइशा’ चित्रपटानंतर ‘भक्षक’मध्ये भुमी पेडणेकर पुम्हा एकदा संजय मिश्रासोबत(sanjay mishra) स्क्रिन शेअर करणार आहे. याबद्दल ती म्हणते,’संजय मिश्रा माझ्यासाठी खुप भाग्यवान आहेत. करियरच्या सुरूवातीला जे लोक तुमच्याशी जोडलेले असतात ते तुमच्यासाठी खुप खास असतात. जेव्हा चित्रपटाचे निर्माते गौरव वर्मांनी सांगितलं की, चित्रपटात संजय मिश्रा आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी खुप उत्साही होते. चित्रपटात ते असे एकंच माणुस आहे ज्यांना माहिती आहे, की मी काय करू इच्छीते? ‘

‘भक्षक'(Bhakshak) चित्रपटाने दिग्दर्शन पुलकितने(Pulkit) केले आहे. पुलकीत याबद्दल बोलतात की,”या चित्रपटात जो घटनाक्रम दाखवला गेला आहे.तो कोणत्याही एका घटनेवरून घेतलेला नाही. या चित्रपटात देशातील अशा तमाम घटना दाखवल्या आहेत. आशा आहे की हा चित्रपट कुठे ना कुठे बदल घडवुन आणेल. माझ्या घरी जर अशा गोष्टी घडल्या तर मला दुःख होते. परंतु जर हीच गोष्ट दुसऱ्या मुलींसोबत घडली तर दुःख का होत नाही? याच विचाराने मला हा चित्रपट बनवण्यासाठी प्रेरित केले.मी अशा अनेक मुलींना भेटलो आहे. ज्या या घटनेच्या शिकार बनल्या आहेत. ”

‘भक्षक’ चित्रपटाची निर्मीती शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊस ‘रेड चिलीज'(Red Chillies) द्वारे गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटात भुमी पेडणेकर आणि संजय मिश्रा यांच्या व्यतिरिक्त आदित्य श्रीवास्तव(aditya srivastava) आणि सई ताम्हणकरही(sai tamhankar) मुख्य भुनिकेत आहेत. चित्रपटाचे निर्देशक पुलकित म्हणतात,”‘ भक्षक’ चित्रपटाच्या माध्यमातुन समाजातील कठोर वास्तविकता दाखवणं आमचा उद्देश आहे. बदल घडवणाऱ्या चर्चांना पाठिंबा द्यायचा आहे. मी यात अजुन खुप लोकांच्या सहभागाची अपेक्षा करत आहे. ” हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातुन 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

#जोगबोलणार, जोगांनी BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी ,पुष्कर जोग म्हणाला,’ केवळ माणुसकी हाच धर्म…’
शाहरुख खानसोबत कोलॅबोरेट करणार KGF फेम यश? यशच्या बाॅलिवूडमधील दुसऱ्या चित्रपटाची चर्चा!

हे देखील वाचा