Saturday, March 2, 2024

#जोगबोलणार, जोगांनी BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी ,पुष्कर जोग म्हणाला,’ केवळ माणुसकी हाच धर्म…’

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासुन मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांचा मोर्चा(Maratha Aarakshan ) चालु होता. नुकतेच 27 जानेवारीला महाराष्ट्रसरकारने मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या आणि मनोज जरांगे पाटलांनी त्यांचे उपोषण सोडले. त्यापुर्वीच राज्यात मराठा आरक्षणाच्या सर्व्हेला सुरुवात झाली होती. सध्याला मराठा आरक्षणाच्या सर्व्हेवरून सोशल मिडीयावर भलतीच खळबळ चालु आहे. 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनी केतकी चितळेने याचसंबंधी एक पोस्ट केली होती.त्यावरुन नेटीझन्सने प्रचंड ट्रोल केले होते. इतकेच नव्हे तर त्यानंतर केतकीच्या सोशल मिडियावर तिच्या अंगावर शाई टाकल्याचाही विडीयो अपलोड केला गेला होता. आता केतकीनंतर अजुन एक अभिनेता या विषयामुळे ट्रोल होत आहे.

मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता पुष्कर जोग(Pushkar Jog) तसा त्याच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे प्रसिद्ध होताच परंतु मराठी बिगबाॅस(BigBoss Marathi ) च्या पहिल्या सिझनमुळे तर त्याला मराठी सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख मिळाली.त्याचा नवीन चित्रपट मुसाफिरा(Musafiraa) 2फेब्रुवारीला सिनेमाघरात येणार आहे. त्यामुळे तर इतके दिवस चर्चेत होताच परंतु आता तो एका वेगळ्याच बोहऱ्यात अडकताना दिसतोय. केतकी चितळे नंतर पुष्कर देखील आता नेटीझन्सकडून ट्रोल केला जात आहे.

पुष्करने रविवारी त्याच्या सोशल मिडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.त्या पोस्टनंतर सोशल मिडियावर त्याला भलतंच ट्रोल केलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणीही केली होती. या सगळ्या प्रकारामुळे सोशल मिडियावर अजुन एक पोस्ट करत त्याने बीएमसीच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

जोगांनी मागितली माफी
रविवारी पुष्कर जोगने केलेल्या त्याच्या वादग्रस्त पोस्टमुळे तो सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल झाला. त्यामुळे त्याने काल 29 जानेवारीला पुन्हा एक स्टोरी पोस्ट करत बीएमसी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. यावेळी पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले ,”मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो.”
पुढे पुष्करने असेही लिहीले की “अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी ”

काय होती पुष्करची ‘ती’ पोस्ट
रविवारी पुष्कर जोगने स्टोरी पोस्ट करत एक वादग्रस्त विधान केले होते. या पोस्टमध्ये बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला त्याची जात विचारल्याबद्दल त्याचा संताप दिसुन येत होता. त्याने या पेस्टमध्ये असे लिहिले होते की,”काल बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते…ते जर बाई माणूस नसते तर 2 लात नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार ”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
केतकी चितळे पुन्हा होतेय ट्रोल,मराठा जातीवरुन केले वक्तव्य; पाहा काय म्हणाली अभिनेत्री
बिगबाॅस विजेत्या मुनावर वगळ्याच शैलीत दिले सलमान खानला धन्यवाद,इंस्टावर शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा