शाहरुख खानसोबत कोलॅबोरेट करणार KGF फेम यश? यशच्या बाॅलिवूडमधील दुसऱ्या चित्रपटाची चर्चा!

साउथचा सुपरस्टार यश केजीएफ-2(KGF-2) चित्रपटापासुन चाहत्यांचा लाडका बनला आहे. त्याने केजीएफ पासुन स्वतःचा फॅनफाॅलोविंग तयार केला आहे. आता अभिनेता त्याच्या येणाऱ्या चित्रपटासाठी खुप चर्चेत आहे. त्याचा ‘टाॅक्सिक’ हो चित्रपट लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो या चित्रपटाच्या तयारीत असतानाच त्याच्या प्रोजेक्टबाबतीत एक नवीन अपडेट समोर येत आहे. नुकतेच त्याने शाहरुख खानसोबत(Shah rukh khan) काम करण्याची त्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचसोबत असं घडण्याच्या शक्यतेबाबतंही त्याने चर्चा केली आहे.

यश फक्त साउथमध्येच मर्यादित न राहता, आता बाॅलिवुडकडेही वळताना दिसत आहे. मध्यंतरीच अशा बातम्या येत होत्या की यशने नितेश तिवारींचा(Nitesh Tiwari) नवीन चित्रपट रामायण साइन केला आहे. त्या चित्रपटात तो रावणाची भुमिका करणार असल्याचंही सांगितलं जातंय. अशातंच आता तो त्याचा दुसरा बाॅलिवूड चित्रपट साइन करण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं जात आहे.

बरोबर कथेची आहे आतुरता
या सर्व अफवांच्या दरम्यान आता यश(South superstar Yash) आणि शाहरुख खानमध्ये एका चित्रपटासंदर्भात वाटाघाटी सुरु असल्याचा दावा केला जात आहेत. परंतू याशिवाय असंही समोर येत आहे की, त्यांना या निर्णयापासून एकंच गोष्ट थांबवत आहे ती म्हणजे, एक योग्य स्क्रिप्ट . रिपोर्टनुसार यश आणि शाहरुख खानमध्ये सोबत काम करण्यावरुन बोलणं झालं आहे. या विचारामुळे दोन्ही अभिनेते प्रचंड उत्साहात आहेत. परंतू त्यांना सोबत काम करण्यासाठी एका योग्य प्रोजेक्टची गरज आहे.कारण येणार्या प्रोजेक्टमध्ये साउथचा सुपरस्टार आणि बाॅलिवूडचा बादशाह एकत्र दिसणार असल्यामुळे तो प्रोजेक्ट खुप अपेक्षा घेऊन येणार आहे. त्यामुळे दोन्ही अभिनेते त्यांच्या चाहत्यांना नाराज करु इच्छित नाहीत. अशा सगळ्या कारणांमुळे अभिनेत्याला हा निर्णय विचारपुर्वक घ्यायचा आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊन चाहत्यांची निराशा करायची नाही.

रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत सुरु आहे वाटाघाटी
रिपोर्टमध्ये असाही दावा केला जात आहे की, यशचं एका वेगळ्या प्रोजेक्टसाठी रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत(Red Chilli’s Entertainment,) बोलणं सुरु आहे. टीमसोबतच्या एका सुत्राकडुन अशी माहिती आली आहे की यश आधीपासुनंच त्याच्या दुसऱ्या चित्रपटासाठी वाटाघाटी करत आहेत. त्या प्रोजेक्टसाठी त्यांचं रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत बोलणं सुरु आहे. सध्या त्यांनी अभिनेत्यासोबत क्रिएटीव विचारांवर चर्चा केली आहे. ते अभिनेत्याला आवडलेही आहे. तो पाहु इच्छीतो की हे कसं होईल. रिपोर्टम्धे असं सांगितलं आहे की, यश सध्यातरी फक्त त्याच्या हातात असणाऱ्या प्रोजेक्टसवरंच फोकस करत आहे.

यशचा आगामी चित्रपट
अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर, सध्या यशच्या हातात काही प्रोजेक्ट आहेत. त्याने मागच्याच महिन्यात त्याच्या एका कन्नाडा चित्रपटाची घोषणा केली आहे.या चित्रपटाचं नाव ‘टाॅक्सिक’ असुन या चित्रपटात अभिनेता खलनायकाची भुमिका करताना दिसणार आहे. यासोबतंच अशीही माहिती समोर आली आहे की, या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतु मोहनदास करणार आहेत. या चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल अजुन कोणतीही माहिती समोर आलेली नाही.तरीही असे ऐकण्यात येत आहे की, चित्रपटातील महिलेच्या मुख्य भुमिकेसाठी करीना कपूरच्या नावावर विचार केला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी शबाना आझमीला ऍवाॅर्ड,पुरुषांमध्ये विकी कौशलने केला कब्जा
बॉलिवूडमधील ‘या’ गायिकेला ओळखले का? सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांना केलंय मंत्रमुग्ध