भूषण कुमार याच्यावर बलात्काराची केस दाखल; आता टी-सीरिजने वक्तव्य जाहीर करत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया


गीतकार गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी-सीरिजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार, याच्या विरुद्ध एका ३० वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी केस दाखल केली आहे. ही गोष्ट समोर आल्यावर भूषण कुमारच्या कंपनीने त्यांचे वक्तव्य जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, हे सगळे आरोप चुकीचे आहेत. डीएन नगर पोलिसांनी भूषण विरूद्ध आयपीसी कलम ३७६, ४२०, ५०६ नुसार केस दाखल केली आहे. (Bhushan Kumar team issued statement says rape allegation are false)

भूषण कुमारवर लावलेल्या या आरोपांनंतर टी-सीरिजने त्यांचे वक्तव्य जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, “मिस्टर भूषण कुमार यांच्यावर लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. आम्ही हा आरोप फेटाळून लावत आहोत. २०१७ ते २०२० पर्यंत कामाचे लालच दाखवून त्या महिलेचे लैंगिक शोषण केले ही गोष्ट साफ खोटी आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “आमच्या रेकॉर्डनुसार त्या महिलेने सुरुवातीला आमच्या चित्रपटात आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. मार्च २०२१ मध्ये ती महिला भूषण कुमारकडे तिच्या वेब-सीरिजसाठी मदत मागण्यास आली होती. ही वेब-सीरिज ती प्रोड्युस करणार होती. परंतु पैसे देण्यास नकार दिला होता. जून २०२१ मध्ये जेव्हा लॉकडाऊन हटवलं, तेव्हा त्या महिलेने टी-सीरिजच्या बॅनरजवळ रंगदारीच्या रुपात जास्त रकमेची मागणी केली.

त्यांनी पुढे सांगितले की, “रंगदारीमुळे या महिलेविरुद्ध कंपनीने १ जुलै २०२१ ल मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. ज्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला होता. सगळे ऑडियो रेकॉर्डिंग मेसेज पोलिसांकडे जमा केले होते. आता तिने बलात्काराची जी केस दाखल केली आहे, ती वेगळी काही नसून जुन्या गोष्टींचा बदला आहे. कंपनीने सांगितले की, या गोष्टीसाठी आम्ही आमच्या वकीलांसोबत बोलत आहोत.”

या ३० वर्षाच्या महिलेने भूषण कुमारवर गंभीर आरोप लावले आहेत की, त्याने २०१७ पासून ते २०२० पर्यंत काम देण्याचे लालच दाखवून तिचे लैंगिक शोषण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नापूर्वी दिशाच्या रूमबाहेर ‘मेरी दुल्हन कहा है’, म्हणत ओरडताना दिसला राहुल; नववधू बाहेर येताच…

-सुपरस्टार नागार्जुनची सून समंथाने कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाली, ‘माझा गुड बॉय आणि…’

-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज


Leave A Reply

Your email address will not be published.