Wednesday, July 3, 2024

बच्चन कुटुंबाची लेक असूनही राहिली लाईमलाईटपासून दूर, बिग बींनी वाढदिवशी केले थ्रोबॅक फोटो शेअर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. बुधवारी (17 मार्च) त्यांची मुलगी श्वेताने आपला वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म 17 मार्च, 1974 मध्ये मुंबईत झाला होता. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बिग बींनी तिचे काही थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बींनी दोन ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. त्यात श्वेता खूप लहान आहे. आणि दुसरा फोटो काही दिवसांपूर्वीचा आहे. हे दोन फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांनी असे कॅप्शन दिले आहे की, “मुली खूप चांगल्या असतात. श्वेताला दिलेल्या तुमच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे.”

श्वेता आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिची मुलगी नव्या नवेली नंदाने देखील खास अंदाजात तिच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने असे लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थडे मॉम अँड डॅड, तुमच्या सारखं कोणीच नाही.” श्वेताचे पती निखिल नंदा यांचा वाढदिवस 18 मार्चला असतो.

श्वेताचा जन्म 1974 मध्ये मुंबई येथे झाला. आई- वडील दोघेही कलाकार असतानाही तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला नाही. तिच्या घरातले सगळे आज इंडस्ट्रीमध्ये आहेत. पण ती यापासून नेहमीच लांब राहिली. असे असले तरीही ती पार्टीज आणि कार्यक्रमांमध्ये नेहमीच हजेरी लावताना दिसते. श्वेताने आपली कारकीर्द वेगळ्या क्षेत्रात घडवण्याचा निर्णय घेतला. ती एक लेखिका आहे. तिने 2018 मध्ये ‘पॅराडाइज टॉवर्स’ नावाचं एक पुस्तक लिहिले आहे. तिचा पती निखिल नंदा हा व्यावसायिक आहे. त्या दोघांना नव्या आणि अगस्त अशी दोन मुले आहेत.

अनेक चाहत्यांना हे माहिती नसेल, परंतु माध्यमातील वृत्तानुसार, श्वेेता आणि निखिल यांचा घटस्फोट झाला आहे. इतकेच नाही, तर श्वेता ही मागील काही वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसोबतच राहते. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपले नंदा आडनाव काढून केवळ श्वेता बच्चन असे नाव ठेवले आहे.

एका मुलाखतीमध्ये श्वेताने सांगितले होते की, ती एका गृहिणीच आयुष्य एंजॉय करत आहे. या गोष्टीवरून तिला खूपच ट्रोल केलं जातं होत. पण तिच्या मुलीने सगळ्यांना असं उत्तर दिलं की, सगळ्यांची बोलती बंद झाली.

श्वेताने असे लिहले होते की, “आई आणि पत्नी असणं हा एक फुल टाईम जॉब आहे. त्यामुळे अश्या महिलांचा कधी अपमान करू नका ज्या संपूर्ण घर सांभाळतात.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

-अगं बाई मोडशील ना!! डोक्यावर उभे राहून मलायकाने केला प्रेक्षकांना नमस्कार

-अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड डान्स व्हिडिओ; ‘या’ भितीपोटी बंद केला कमेंटचा पर्याय

हे देखील वाचा