मातृदिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केला चिमणीचा व्हिडिओ, सांगितले आईचे महत्त्व


बॉलिवूडचे  ‘महानायक’ अमिताभ बच्चन हे कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. कोरोनाच्या काळात त्यांनी अनेक किस्से आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहेत. ज्याला चाहत्यांची खूप जास्त पसंती मिळाली होती. बिग बी आज मातृदिन साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय कलाकारांपैकी एक आहे. जिथे ते गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

मातृदिनानिमित्ताने बिग बींनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी संदेश दिला आहे की, वेळ कितीही वाईट असली, तरीही आपली आई नक्कीच आपले रक्षण करण्यासाठी तिथे उभी असेल. अमिताभ यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक चिमणी आपल्या अंड्यांजवळ उभी आहे, थोड्या वेळाने या चिमणीवरुन एक ट्रॅक्टर जातो. पण ही चिमणी तिचे जीवन धोक्यात घालून, शेवटपर्यंत अंडी वाचवण्यासाठी तिथे उभी आहे. या व्हिडिओमध्ये, ती तिची सर्व अंडी वाचवते, ज्यात बरीच पिल्ले असतात.

हा व्हिडिओ शेअर करताना बिग बींनी ‘मातृदिनाच्या शुभेच्छा, प्रत्येक दिवस म्हणजे मातृदिन,’ असे लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंत केला आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांसाठी बर्‍याचदा पोस्ट करतात. ज्यामुळे ते सोशल मीडियावर प्रत्येकाशी संपर्कात राहतात. आजकाल अमिताभ बच्चन कोरोनामुळे त्यांच्या घरी आहे, जेथे ते सतत आपल्या तब्येतीची काळजी घेत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे, तर महामारीमुळे अमिताभ बच्चन यांचे अनेक मोठे चित्रपट प्रर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. हे चित्रपट म्हणजे इंटर्न, झुक, चेहरे, ब्रह्मास्त्र, मायडे आणि गुडबाय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, मुंबईतील चित्रपटांचे शूटिंग बंद झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चित्रपटसृष्टीची वाघीण आली’, रश्मी देसाईचा रस्त्यावरील कॅटवॉक व्हिडिओ पाहून अभिनेत्याची भन्नाट कमेंट

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.