‘चित्रपटसृष्टीची वाघीण आली’, रश्मी देसाईचा रस्त्यावरील कॅटवॉक व्हिडिओ पाहून अभिनेत्याची भन्नाट कमेंट

Rashami Desai's catwalk in short dress on road, video viral


टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई आज भलेही छोट्या पड्यापासून लांब गेली आहे. परंतु आजही ती लाईमलाईटमध्ये असते. रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचा एका व्हिडिओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या नवीन व्हिडिओने तिच्या चाहत्यांची झोप उडाली आहे.

रश्मी देसाईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घालून रस्त्यावर कॅटवॉक करताना दिसत आहे. तिने केसांना सेमी कर्ल केले आहे. तसेच नारंगी रंगाचे सॅंडल घातले आहे. तिने सुंदर कानातले घातले आहे. हाय हिल्स घालून ती खूपच स्टनिंग दिसत आहे.

रस्त्यामध्ये केलेला तिचा हा कॅटवॉक तिच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘फलक तक चल साथ मेरे’ हे गाणे वाजत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करून लिहिले की, “तुझ्या या वॉकने हृदयावर वार केला आहे.” दुसरीकडे अभिनेता अर्जुन बिजलानी याने लिहिले आहे की, “चित्रपटसृष्टीची वाघीण आली.”

रश्मी कपूरने या आधी एकता कपूरची सुपरनॅचरल मालिका ‘नागिन 4’ मध्ये श्लोकाचे पात्र निभावले होते. तिच्या या पात्राला भरभरून पसंती मिळाली होती. या सोबतच तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती बिग बॉस 13 मध्ये तिसरी रनरअप विजेती होती. तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केले आहे. तिने ‘रावण’, ‘परी हू मैं’, ‘उतरण’ , ‘दिल से दिल तक’, ‘नागिन’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.