‘बिग बॉस 16‘ मधील आजचा ‘वीकेंड का वार’ एपिसोड चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. यावेळी चाहत्यांना पंजाबची कॅटरिना म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल या शोमध्ये दिसणार आहे. प्रोमो पाहता, यावेळचा ‘वीकेंड का वार’ खूप मजेशीर असणार आहे. शहनाजला बिग बॉस शोमधूनच ओळख मिळाली. यामुळेच शहनाजचे या घराशी जुने नाते आहे.
या शोपासून आतापर्यंत शहनाज (shehnaaz gill) हिने तिची लोकप्रियता कायम ठेवली आहे. ‘वीकेंड का वार’च्या आजच्या म्हणजेच शुक्रवार (दि. 9 डिसेंबर)च्या एपिसोडमध्ये शहनाज सलमान खानसोबत डान्स करताना दिसणार आहे. शहनाज ‘बिग बॉस 13’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. या शोमधून तिला वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. शहनाजला स्पर्धक म्हणून प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. शहनाजच्या निरागसतेने सर्वांनाच तिचे चाहते बनवले होते. या शोमध्ये शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान आणि शहनाज गिल खूप मस्ती करताना दिसत आहेत. रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये, शहनाज गिल धमाकेदार डान्स करताना शोमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून येते. गमतीशीरपणे, सलमान शहनाजला सांगतो की, “ती सीझन 13 मध्ये स्पर्धक म्हणून सलवार कमीज घालून नाचत आली होती आणि आता बघा.” प्रत्युत्तरात शहनाजही सलमानला तिचे कौतुक करायला सांगते आणि सलमान तिला “कुडी पटोला, बम दा गोळा” म्हणतो. हे ऐकून शहनाज खूश झाली आणि त्यानंतर दोघेही ‘टायगर जिंदा है’ मधील ‘दिल दियां गल्लन’ गाण्यावर नाचताना दिसले.
View this post on Instagram
शहनाज गिलही सध्या तिच्या चॅट शो ‘देसी वाइब्स’मुळे खूप चर्चेत आहे. तिचा हा शो चाहत्यांना खूप आवडतो. आतापर्यंत आयुष्मान खुराना आणि विकी कौशल सारखे स्टार्स तिच्या चॅट शोमध्ये आले आहेत. या चॅट शोमध्ये शहनाजही भावूक झालेली दिसली. या गप्पांचे वैशिष्ट्य म्हणजे शहनाजचा निरागसपणा आणि भाेळेपणा चाहत्यांची मनं जिंकत आहे. ( big boss actor salman khan teases shehnaaz gill in bigg boss 16 both danced on tiger jinda hai song)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! बिग बॉस 13 नंतर हिमांशी खुराना झाली डिप्रेशनची शिकार
बाबो! राम गोपाल वर्मा यांच्या गर्लफ्रेंडची लिस्ट काही संपेनाच, यादीतील नावे पाहून तुम्ही व्हाल थक्क