Thursday, March 28, 2024

अर्रर्र! चॅट शोदरम्यान असं काय घडलं की, शहनाज गिल रडली ढसाढसा?

पंजाबची कॅटरिना म्हणून प्रसिद्ध असलेली शहनाज गिल सध्या ‘देसी वाइब्स‘ या चॅट शोमध्ये दिसत आहे. तिच्या या चॅट शोमध्ये अनेक मोठे कलाकार दिसतात ज्यांच्याशी ती मोकळेपणाने बोलत असते. अलीकडेच आयुष्मान खुराना त्याच्या ‘अ‍ॅन ऍक्शन हिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या शोमध्ये उपस्थित होता, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘देसी वाइब’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये शहनाज (shehnaaz gill) आयुष्मान खुराना (ayushmann khurrana) याच्यतासोबत अनेक गोष्टींवर बोलताना दिसली. यादरम्यान आयुष्मानने तिचे स्ट्राॅंग असल्याचे वर्णन केले आणि सांगितले की, “ती खूप स्ट्राॅंग मुलगी आहे आणि तिला जे काही बोलायचे आहे ते ती उघडपणे बोलते.” यानंतर शहनाजही तिच्या भावना शेअर करताना दिसली. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आयुष्यात अनेक भावनिक क्षण आले, पण मी कधीच कोणाला सांगू शकले नाही कारण, लोक म्हणायचे की, मी हे सहानुभूतीसाठी करते.”

हे सांगताना शहनाजच्या डोळ्यात पाणी आले. 2021 मध्ये शहनाजने आपला जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) याला गमावले हाेते. दोघांची मैत्री बिग बॉस शो दरम्यान झाली. त्यांचे चाहते दोघांनाही प्रेमाने ‘सिडनाज’ म्हणायचे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाजच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर शहनाज अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसल्यानंतर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शहनाजला ही संधी सुपरस्टार सलमान खानने दिली. शहनाज लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाविषयी बाेलायचे झाले, तर अभिनेत्याचा ‘अ‍ॅन ऍक्शन हिरो’ हा चित्रपट 2 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटात त्याच्या व्यतिरिक्त जयदीप अहलावतही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.(actress shehnaaz gill got emotional on her chat show desi vibes in front of an bollywood hero ayushmann khurrana)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कार्तिकच्या आधी वरुणला आलेली ‘हेरा फेरी 3’ची ऑफर, पण ‘या’ कारणास्तव दिला नकार

पत्नी नताशाकडून हार्दिक पंड्याने घेतले डान्सचे धडे; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘चंपक चाचासारखा डान्स’

हे देखील वाचा