Tuesday, July 9, 2024

अधिकृत घोषणेच्या आधीच लीक झालं ‘बिग बॉस १५’च्या विजेत्याचं नाव? फोटो होतोय व्हायरल

सलमान खानचा (Salman Khan) लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १५’च्या विजेतेपदाचा किताब कोण पटकावणार? याचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस’च्या चाहत्यांनाही या भागाची जोरदार उत्सुकता लागली आहे. अंतिम पाच स्पर्धकांमध्ये करण कुंद्रा (Karan Kundrra), प्रतिक सहजपाल (Pratik Sehajpal), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि निशांत भट्ट (Nishant Bhatt) यांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये या शोचा विजेता कोण ठरणार, याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. मात्र या भागामध्ये विजेत्याचे नाव घोषित करण्याआधीच इंटरनेटवर विजेता म्हणून एक फोटो झळकत आहे, ज्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नक्की काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊया…

कलर्स चॅनलवरील लोकप्रिय शो ‘बिगबॉस १५’च्या अंतिम निकालाचा क्षण खूपच जवळ आला आहे. लवकरच या लोकप्रिय शोच्या विजेत्याचे नाव घोषित केले जाणार आहे. मात्र विकिपीडीयावर अंतिम विजेत्याचा फोटो आधीच प्रसिध्द झाला आहे. ज्यामध्ये प्रतिक सहजपालला या पर्वाचा विजेता घोषित करणार असल्याचे दिसत आहे. या व्हायरल फोटोने सध्या सोशल मीडियावर सर्वांना गोंधळात टाकले आहे. सलमान खानने अधिकृत घोषणा करण्याआधीच हा फोटो सोशल मीडियावर फिरत असल्याने, चाहत्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

या व्हायरल फोटोमध्ये प्रतीक सहजपाल ‘बिग बॉस १५’चा विजेता, तर शमिता शेट्टी उपविजेती झाल्याची माहिती प्रसारित केली आहे. यासोबतच या फोटोमध्ये विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेबद्लही माहिती दिली आहे. ज्यामध्ये या वर्षीच्या ‘बिग बॉस’ विजेत्याला तब्बल ५० लाख रुपये इतकी मोठी रक्कम मिळणार असल्याचा दावा केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी अशाच प्रकाराचा एक फोटो सोशल मीडियावर या आधीही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये करण कुंद्राला ‘बिग बॉस १५टचा विजेता, तर तेजस्वी प्रकाश उपविजेती होणार असल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, या सगळ्या व्हायरल फोटोंनी चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. मात्र आता या कार्यक्रमाच्या निकालाचा अंतिम क्षण जवळ आला असल्याने प्रत्यक्षात पाहिल्या नंतरच या अंतिम विजेत्याचे नाव समजेल.

हेही वाचा :

हे देखील वाचा