पंजाबी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम हिमांशी खुरानाचे (Himanshi Khurana) वडील कुलदीप खुराणा यांना अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या नायब तहसीलदाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
अटकेनंतर हिमांशीच्या वडिलांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फिल्लौर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पाच महिन्यांपूर्वी गोरया येथे निवडणूक ड्युटीवर असताना कुलदीप खुराणा यांनी नायब तहसीलदाराला मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपानंतर न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई केली. वृत्तानुसार, नायब तहसीलदार जगपाल सिंह यांच्या तक्रारीच्या आधारे कुलदीप खुराना यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
आपल्या तक्रारीत जगपाल सिंग यांनी कुलदीप खुराणा यांच्यावर कामात अडथळा आणल्याचा, शिवीगाळ आणि ड्युटीवर असताना मारहाण केल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यासोबत असलेल्या एका कर्मचारी सदस्याने या घटनेचा व्हिडिओ बनवला होता, जो या प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावा होता. लुधियानामध्ये पोलिसांनी अनेक छापे टाकूनही अटक टाळल्यानंतर अनेक महिन्यांनंतर, खुराणाला गुप्त माहितीच्या आधारे घरातून अटक करण्यात आली. कुलदीप खुराना यांना फिल्लौर न्यायालयात नेण्यात आले, जिथे न्यायालयीन कोठडीनंतर खुराना यांची कपूरथळा तुरुंगात रवानगी करण्यात आली.
गोरयामध्ये खासदार निवडणुकीदरम्यान घडलेल्या या घटनेने वाद निर्माण झाला, कारण कुलदीप खुराणा यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप होता. गोराया पोलिस स्टेशनचे एसएचओ पलविंदर सिंग यांनी अटकेची पुष्टी केली आणि सांगितले की, अभिनेत्रीच्या वडिलांवर कर्तव्यावर असताना सरकारी अधिकाऱ्याला अडथळा आणल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘कंतारा चॅप्टर 1’चे शूटिंग सुरूच, बस अपघातात कोणीही जखमी नाही
बहिणीला आवडला नाही रणबीरचा ॲनिमल; तुलना केली आजोबा राज कपूर यांच्याशी…