Monday, March 4, 2024

असीम रियाझसाठी हिमांशी खुरानाने तोडले होते ९ वर्षांचे रिलेशनशिप, वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी…

‘बिग बॉस’चा १३वा सीझन चांगलाच गाजला. आजही या सीझनचे टीआरपीचे रेकॉर्ड इतर सीझन तोडू शकला नाही. यामध्ये मैत्री, प्रेम, ड्रामा, राग, भांडण, सर्वकाही पाहायला मिळालं. या सीझनमधील जवळपास सर्वच स्पर्धक त्यावेळी ट्रेंडिंग असायचे. शेहनाझ गिलसोबत भांडण आणि असीम रियाझसोबतच्या मैत्रीमुळे हिमांशी खुराना चांगलीच लाईमलाईटमध्ये आली होती.  सोमवारी (२७ नोव्हेंबर) हिमांशी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने जाणून घेऊया, तिच्याबद्दल काही खास गोष्टी…

हिमांशी खुरानाचा जन्म २७ नोव्हेंबर १९९१ रोजी, पंजाबमधील किरतपूर साहिब येथे झाला. हिमांशीच्या आईचे नाव सुनीत कौर आहे. ती सांगते की तिची आई तिच्या आयुष्याची प्रेरणा आहे. हिमांशी मेडिकल सायन्सची विद्यार्थिनी होती, पण तिचा कल नेहमीच मॉडेलिंगच्या बाजूने असायचा. हिमांशीने २०११ मध्ये वयाच्या १८व्या वर्षी मिस लुधियानाची स्पर्धा जिंकली होती. तिथूनच तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. (birthday special himanshi khurana broke the 9 year old relationship for asim riaz but know the special things related to him)

हिमांशी सुरुवातीपासून पंजाबी अल्बम आणि चित्रपटांमध्ये सक्रिय होती. ‘सड्डा हक’ या पंजाबी चित्रपटात तिने काम केले. यानंतर हिमांशीचे आयुष्यच बदलून गेले. या चित्रपटानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने हार्डी संधूसोबत ‘सोच’, सिप्पी गिलसोबत ‘इन्सोम्निया’ आणि जस्सी गिलसोबत ‘लादेन’ या गाण्यांमध्ये काम केले.

हिमांशी पंजाबमधील एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने अनेक पंजाबी अल्बममध्ये गाणी गायली आहेत आणि अनेक अल्बममध्ये अभिनयही केला आहे. पंजाबमध्ये ती एक प्रसिद्ध नाव आहे. पण जेव्हा तिने ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतला तेव्हा ती संपूर्ण भारताभर प्रसिद्ध झाली. ‘बिग बॉस’ने तिला एक नवी ओळख दिली. ‘बिग बॉस’मधील तिचा प्रवास फार मोठा नसला, तरी ती एक प्रबळ स्पर्धक होती. तिची आणि असीमची जोडी बिग बॉसच्या टॉप कपल्सपैकी एक असल्याचं म्हटलं जात होतं.

हिमांशीने ‘बिग बॉस १३’ मध्ये भाग घेतला, तेव्हा तिच्या आणि असीम रियाझच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. दोघांची केमिस्ट्री शोमध्ये प्रेक्षकांनी पाहिली होती, तसेच शो संपल्यानंतर दोघेही भेटत असत. दोघांनी एकत्र एक म्युझिक अल्बमही केले आहेत. या अल्बमला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यांच्या नात्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. तिच्या आणि असीमच्या लग्नापर्यंत चर्चा सुरू होत्या आणि काही दिवसांनी त्यांचे ब्रेकअप झाले. या बातम्यांवर दोघेही उघडपणे बोलले नाहीत. बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी हिमांशीने सांगितले होते की, ती चाओसोबत ९ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. असीमसोबतच्या जवळीकतेमुळे तिच्या प्रियकराने तिच्यासोबतचे नाते तोडले.

हिमांशी नुकतीच कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. तिची प्रकृती इतकी बिघडली होती की, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या आजारपणाच्या बातमीने चाहते खूपच निराश झाले होते. मात्र, ती लवकरच बरी झाली आणि पुन्हा त्याच उत्साहात कामावर रुजू झाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-
फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 : ‘ज्युबिली’ला मिळाले सर्वाधिक पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी
सुजलेला चेहरा, डोळ्यांना जखम…. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या ‘या’ अभिनेत्रीवर हल्ला

हे देखील वाचा