Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सिनेविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो ४० वर्षांचा होता. त्याचे पार्थिव सध्या कूपर रुग्णालयात आहे. तसेच पंचनामा केला जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, काल रात्री तो औषध घेऊन झोपला होता आणि सकाळी उठलाच नाही. त्याच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज कलाकार त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हरने ट्वीट करत लिहिले आहे की, “सिद्धार्थ शुक्लाबद्दल जाणून हैराण आणि दु:खी झालो आहे. खूप लवकर गेलास.”

याव्यतिरिक्त मनीष पॉलनेही ट्वीट केले आहे. त्याने लिहिले की, “हे अविश्वसनीय आहे. खूप खूप वाईट वाटत आहे. सहकारी, मित्र.”

सिद्धार्थला ‘बालिका वधू’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. दु:खद म्हणजे या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता या मालिकेतील सिद्धार्थनेही जगाचा निरोप घेतला आहे.

सिद्धार्थने सन २००८ मध्ये ‘बाबुल का अंगना छूटे ना’ मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘बालिका वधू’ मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर त्याने परत कधीच मागे वळून पाहिले नाही. तसेच तो ‘दिल से दिल तक’ या मालिकेतही झळकला होता. याव्यतिरिक्त सिद्धार्थ ‘फियर फॅक्टर- खतरों के खिलाडी’च्या सातव्या पर्वातही झळकला होता. त्याने ‘सावधान इंडिया’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोदेखील होस्ट केला होता. टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त शो असलेल्या ‘बिग बॉस १३’मध्ये त्याने विजेतेपद पटकावले होते. तसेच त्यातून त्याला कमालीची प्रसिद्धी मिळाली. यादरम्यानच त्याची आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलची जोडी चांगली पसंत करण्यात आली. दोघेही नुकतेच ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसले होते.

त्याने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जाळ अन् धूर संगटच! राखी सावंतने ‘कमरिया लचके रे’ गाण्यावर लावले ठुमके; व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘पवित्र रिश्ता २.०’चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला; चाहते म्हणाले, ‘सुशांतशिवाय सर्वकाही अपूर्ण’

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

हे देखील वाचा