Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तुझी सीमा पार करू नकोस’, अभिजीत बिचुकलेने किसची मागणी करता देवोलिनाने सुनावले खडेबोल

बिग बॉस १५‘ (Bigg Boss 15)मध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. शोमध्ये राडे, भांडण नेहमीच होत असतात. अशातच घरात पुन्हा एकदा भांडण झाल्याचे दिसून आले आहे. येणाऱ्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. घरात अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) याची एन्ट्री झाल्यापासून अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. अशातच टास्क दरम्यान देवोलिनाकडे अभिजित बिचुकलेने अशी मागणी केली की, जी ऐकून ती एकदम भडकली. याचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अभिजित देवोलिनाच्या गालाला हात लावत म्हणतो की, “तू मला किस कधी करणार?” हे ऐकून देवोलिना खूप चिडते आणि त्याला खूप काही बोलते.

कलर्स टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये आपण पाहू शकतो की, घरात म्युझिअमचा टास्क चालू असतो. त्यावेळी स्पर्धकांना एकमेकांचे सामान चोरायचे असते. यावेळी अभिजित देवोलिनाच्या गालाला हात लावतो आणि म्हणतो की, “माझ्याकडे खूप सामान आहे, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. पण मला तुझ्याकडून किस पाहिजे.” हे ऐकून देवोलिना किस करण्यास नकार देते. यासोबत देवोलिना त्याला चेतावणी देते की, “तुझी सीमा पार करू नकोस.” (bigg boss 15 abhujeet bichukale asked devoleena to kiss him, actress said do not cross the line)

देवोलिना त्याला बोलल्यानंतर त्याने सांगितले की, “मी मस्करी करत होतो.” त्यानंतर देवोलिना आणि अभिजीतमध्ये खूप भांडण होतात. त्यांच्या या भांडणात प्रतीक मधे येतो आणि देवोलिनाला पाठिंबा देतो. तेव्हा तेजस्वी येते आणि ती देखील देवोलिनाला पाठिंबा देते. यानंतर देवोलिना तेजस्वी आणि करणसमोर रडते.

अभिजित आणि देवोलिना हे खूप चांगले मित्र आहेत. घरात ते बराचवेळ एकत्र असतात आणि एकत्र खेळ देखील खेळतात. परंतु अभिजीतच्या या वक्त्यव्याने देवोलिना खूप दुखावली आहे यामुळे आता या घटनेनंतर त्यांच्या मैत्रीत फूट पडते का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हेही वाचा :

World’s Most Admired Men 2021 | टॉप २०मध्ये ५ भारतीय, ‘किंग खान’ १४व्या क्रमांकावर; पंतप्रधान मोदींचा नंबर घसरला

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार

Shriram Lagoo Death Anniversary | आठवण नटसम्राटाची, श्रीराम लागू यांच्या आयुष्यातील हे किस्से तुम्हाला नक्की ठाऊक नसतील

 

हे देखील वाचा