‘बिग बॉस १५’ दिसणार एका वेगळ्या रूपात; तर स्पर्धकांना एकूण सहा महिने राहावे लागणार घरात बंद


टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि विवादित असणारा रियॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोचे १४ भाग पूर्ण झाले आहेत. आता प्रेक्षकांना ‘बिग बॉस १५’ ची उत्सुकता लागली आहे. या शोचे निर्माते देखील शोची जोरदार तयारी करत आहेत. कारण त्यांना लवकरात लवकर हा शो सुरू करायचा आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शोचे निर्माते आता हा शोचे रुपांतर सर्वात यशस्वी आणि मोठ्या शोमध्ये करणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस १५’ ची जोरदार तयारी चालू आहे.

६ महिन्यापर्यंत घरात राहणार स्पर्धक
या सोबतच हा शो कधी चालू होणार आहे आणि तो कधी पर्यंत चालू असणार याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. स्पॉट बॉयने दिलेल्या माहितीनुसार हे पर्व थोडे वेगळे असणार आहे. ६ महिन्यांपर्यंत स्पर्धकांना घरात राहावे लागणार आहे. बऱ्याच दिवसांपासून अशी चर्चा आहे की, हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर हा शो आधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे आणि नंतर टीव्हीवर दाखवला जाणार आहे.

टीव्हीच्या आधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार शो
हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यावेळेस १२ स्पर्धक या शोमध्ये एंट्री करणार आहेत. परंतु हा शो जेव्हा टीव्हीवर दाखवला जाईल, तेव्हा या शोमधील ८ स्पर्धक घराबाहेर होणार आहेत. म्हणजेच या शोमधील सर्वात मोठा भाग म्हणजे इव्हिक्शन, हा शो टीव्हीवर येण्याआधीच होणार आहे. या शोमध्ये उरलेले ४ स्पर्धक हा खेळ खेळणार आहेत. (Bigg Boss 15 contestant will have to stay in home for 6 months)

मागील २ सिझनमध्ये झालेत अनेक प्रयोग
स्पॉट बॉयने या गोष्टीचा खुलासा केला नाही, पण हाती आलेल्या माहिती नुसार, हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित व्हावा अशी मागणी प्रेक्षकांकडूनच आली होती. त्यामुळे या शोच्या निर्मात्यांनी हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन पर्वामध्ये या शोच्या निर्मात्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. यातील काहीच यशस्वी झाले आहेत. पण आता निर्माते काय प्रयोग करणार आणि ते यशस्वी होणार की नाही हे पाहणे रंजक ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.