बिग बॉस १५ : देवोलीना अन् निशांतमध्ये भांडण, तर शमिता तेजस्वीला दुर्लक्षित करत म्हणाली…

बिग बॉस १५‘ (Bigg Boss 15) मध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. या आठवड्यात घरात काही ड्रामा पाहायला मिळणार आहे. एकीकडे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचे घरात चांगलेच भांडण झाले आहे. तसेच दुसरीकडे निशांत भट्ट आणि देवोलीना यांच्या मैत्रीत फूट पडली आणि त्यांच्या भांडणाचे कारण बनली तेजस्वी प्रकाश. या आठवड्यात तेजस्वी, करण, उमर रियाज, अभिजित बीचुकले आणि राखी सावंतचा पती रितेश हे नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात देवोलीना, शमिता, प्रतीक आणि रश्मीसोबत फिनाले विकमध्ये सामील होण्यासाठी भांडताना दिसत आहे.

तेजस्वी प्रकाश देवोलीनासोबत बसून खेळाबाबत बोलत होती. यावेळी तेजस्वी देवोलीनाला म्हणते की, “तू नॉमिनेट होण्यासाठी खरचं तयार आहे? यावेळी देवोलीना “हो” म्हणाली. यावर तेजस्वी देवोलीनाला म्हणाली की, “निशांत आणि शमिता बोलत होते की, तुला नॉमिनेट नाही व्हायला पाहिजे आणि खाली नाही यायला पाहिजे. हे ऐकून देवोलीनाला खूप राग आला.” (Bigg Boss 15 devoleena Bhattacharjee and Nishant bhatt gets into ugly fight Shamita Shetty furious ar tejasswi prakash)

हे ऐकून देवोलीना रागात निशांत भट्टजवळ किचनमध्ये गेली आणि त्यांनी भांडण करण्यास सुरुवात केली. निशांतने देवीलीनाच्या तोंडावर तिला सांगितले की, “हो, मी हे बोललो होतो.” हे ऐकून तिला आणखीनच राग आला, ती खूप रडत होती आणि अभद्र भाषेचा वापर केला हे ऐकून निशांतला आणखीनच राग आला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्यांचे किचनमध्ये चाललेले हे भांडण गार्डन एरियापर्यंत पोहचले. दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत भांडत होते. निशांतने देवोलीनाला सांगितले की, “परत माझ्याशी अशा भाषेत बोलू नकोस.” त्यांचे हे भांडण शांत करण्यासाठी बाकीच्यांना मधे यावे लागले.

त्यांच्या या भांडणात तेजस्वी प्रकाश खूप छान खूप छान असे म्हणत होती. हे ऐकून शमिताला देखील खूप राग आला आणि ती म्हणाली की, “दोन लोकं भांडत आहेत आणि तू खूप छान असे म्हणत आहेस.” यावर तेजस्वी म्हणते की, “मी माझा पॉइंट सिद्ध केला आणि मी बरोबर होते.” यावेळी शमिता म्हणते की, “या परिस्थितीत तुला दुसऱ्याला चुकीचे सिद्ध करायचे पडले आहे का?”

जेव्हा शमिता करण कुंद्रासोबत बोलत होती, तेव्हा तेजस्वी तिथे आली आणि म्हणाली की, “इथे माझ्याबद्दल बोलत आहात का?” यावर शमिता “हो” असे म्हणाली. यावर तेजस्वी म्हणते की, “मला देखील ऐकायचे आहे.” यानंतर शमिता करणला म्हणते की, “मी या मुलीसमोर काहीच बोलणार नाही.” शमिता तेजस्वीला दुर्लक्षित करत होती. तेजस्वीचे हे वागणे करणला अजिबात आवडले नाही.

हेही वाचा :

जगातील सर्वात कमी उंचीची महिला आहे ज्योती आमगे; बॉलिवूड ते हॉलिवूड, सर्वत्र आहेत तिचे दीवाने

धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिकाची आत्महत्या, ‘देवदूत’ सोनूने पाठवली होती ‘इतक्या’ लाखांची जर्मन रायफल

बिनसलं तर नाही ना…! आमिर ते रजनीकांत, ‘या’ सेलिब्रिटींनी ‘द कपिल शर्मा शो’कडे फिरवली पाठ

 

Latest Post