×

भारती सिंगने सलमानपुढे तिच्या होणाऱ्या बाळासाठी केली हटके मागणी, दबंग खानलाही म्हणावे लागले हो

बिग बॉसचे १५ वे पर्व आता त्याच्या अंतिम भागाकडे सरकत असताना शोमध्ये विविध ट्विस्ट आणि टर्न्स येताना दिसत आहे. नुकतेच या शोमध्ये कॉमेडीयन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी हजेरी लावली होती. हे दोघं बिग बॉसमध्ये त्यांच्या आगामी ‘हुनरबाज’ या शोच्या प्रमोशनसाठी आले होते. विकेंड का वॉरच्या भागात आलेल्या या दोघांनी सलमान खानसोबत खूपच मजा मस्ती केली. यादरम्यान या दोघांनी सलमानसमोर त्यांची एक अतरंगी मागणी देखील ठेवली.

या शोमध्ये भारी सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे त्यांच्या लवकरच येणाऱ्या बाळाची मिठाई घेऊन सलमान खानच्या शोवर पोहचले होते. त्या दोघांना सलमान शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करतो. त्यानंतर भारती सलमानला म्हणते, “सर करण जोहरने आमच्या बाळाला लाँच करण्यासाठी नकार दिला. तू आमच्या बाळाला लाँच करशील?” यावर सलमान त्यांना हो म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

यानंतर भारती सिंग सलमान खानला विचारते की, “सलमान सर तुम्ही आम्हाला बेबी शॉवरसाठी तुमचे फार्म हाऊस देणार का? यासाठी देखील सलमान तयार होतो आणि तिला हो म्हणतो. त्यानंतर भारती हर्षला म्हणते, “बघितले का, मी म्हणाली होती ना सलमान सरांना एकदा मिटही खाऊ घातली की, तर सर्व गोष्टींसाठी हो म्हणतील.” भारतीचे हे बोलणे ऐकून सलमानसोबतच सर्व उपस्थित लोकं जोरजोरात हसायला लागतात. पुढे भारती आणि हर्ष बिग बॉसच्या घरात देखील गेले आणि त्यांनी घरातील सर्व सदस्यांना ते आईबाबा होणार असल्याचे देखील सांगितले. हे ऐकून सर्व सदस्य खूप खुश झाले आणि त्यांचे अभिनंदन केले. पुढे भारती आणि हर्षने प्रत्येक सदस्याला डिस्को डान्स सुद्धा करायला लावला.

तत्पूर्वी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया लवकरच आईबाबा होणार असून, याची माहिती स्वतः भारतीनेच काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरून आणि तिच्या यूट्यूब चॅनेलवरून अतिशय हटके अंदाजमध्ये दिली होती. भारती एप्रिल महिन्यात तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

हेही वाचा :

Latest Post