‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत राहणारा शो आहे. नुकतेच ‘बिग बॉस १५’ मध्ये तेजस्वी प्रकाशने बॉयफ्रेंड करण कुंद्रा याला सांगितले आहे की, तिला राखी सावंतचा पती रितेश याच्याबाबत असहज वाटते. नवीन एपिसोडमध्ये करण आणि तेजस्वी बेडरूममध्ये सोबत बसलेले असतात. यावेळी तेजस्वी करणला म्हणते की, किचनमध्ये प्रतीक सहजपाल हा देखील उपस्थित होता. त्यावेळी तिने ही गोष्ट त्याला देखील सांगितली होती. तेव्हा प्रतीकने तिला मदत करण्याचे वचन दिले होते. करण कुंद्राला रितेशबाबत जेव्हा हे समजले तेव्हा तो हैराण झाला. यासोबत तो आश्चर्य चकित झाला की, तेजस्वी प्रतीकचे कौतुक करत आहे. तसेच तो तिला म्हणाला की, तिने याबाबत त्याला आधी का नाही सांगितले.
करणने जेव्हा तेजस्वीला नीट विचारले तेव्हा तेजस्वीने सांगितले की, “जेव्हा रितेश घरात आला होता, तेव्हा तिला असहज फील झाले होते. तो सारखा माझ्याजवळ येत होता आणि बोलत होता. एकदा तर बोलताना त्याने माझा हात देखील पकडला. तसेच त्याची देहबोली देखील योग्य वाटत नाही. हे सगळं ऐकून करण हैराण झाला.” तेजस्वी म्हणते की, “राखी आणि रितेशसारखे लोक संस्कृतीवर बोलतात.” यावर करण हसतो आणि म्हणतो की, “चांगलं आहे की, राखी आणि रितेशसारख्या माणसांच्या हातात आपल्या देशाची संस्कृती दिली नाही. ” (Bigg boss 15 rakhi sawant husband Ritesh made tejasswi prakash uncomfortable )
तेजस्वी केवळ रितेशबाबत नाही तर अभिजीतबाबत देखील बोलली. अभिजीतला तेजस्वीने होमीओफोबिक आणि मिसोजिनिस्ट असे म्हटले. तेजस्वी म्हणाली की, “मला अभिजीतची भीती वाटते. कारण तो होमीओफोबिक आणि मिसोजिनिस्ट आहे. त्यामुळेच मी त्याच्यापासून आणि जिजूपासून दूर राहते.”
प्रेक्षकांना करण कुंद्रा आणि तेजस्वीची लव्हस्टोरी नकली वाटत आहे. त्या दोघांना या शोमध्ये आल्यावर प्रेम झाले आहे. राखी आणि रितेशने त्यांच्यात आग लावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ते नेहमीच एकमेकांसोबत उभे होते. या एपिसोडमध्ये नेहा धूपिया आली होती. यावेळी राखी आणि रितेशने त्यांच्या रिलेशनवर अनेक प्रश्न उभे केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा