Saturday, January 17, 2026
Home अन्य Bigg Boss 15: वाईट झालं! अखेर तुटलं विशाल- शमिताचं भाऊ-बहिणीचं नातं, अभिनेत्रीने उपस्थित केले प्रश्न

Bigg Boss 15: वाईट झालं! अखेर तुटलं विशाल- शमिताचं भाऊ-बहिणीचं नातं, अभिनेत्रीने उपस्थित केले प्रश्न

‘बिग बॉस १५’मध्ये गेल्या काही काळापासून बरेच ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. एकीकडे गेल्या सहाव्या आठवड्यात राकेश आणि अफसाना या दोघांनाही घरातून बाहेर काढण्यात आले होते, तर शमितालाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे शो सोडावा लागला होता. दरम्यान शमिता शेट्टी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात परतलीच नाही, तर तिने घरातील सदस्यांना काही तिखट प्रश्नही विचारले, ज्याचा अनेक सदस्यांना सामना करावा लागला.

विशालवर उपस्थित केले प्रश्न
शमिता शेट्टीने सर्वप्रथम आपला भाऊ राजीवला कोर्टरूममध्ये बोलावून अनेक प्रश्न विचारले. शमिता म्हणाली की, “ही व्हीआयपी खोली काही विशेष अधिकारांसह तयार केली गेली आहे, परंतु मला वाटते याचा गैरवापर केला जात आहे आणि हे सर्वजण आधीच त्यांची रणनीती बनवतात की, कोणता सदस्य व्हीआयपीचा सदस्य होईल.” नंतर शमिताने विशालवर प्रश्न उपस्थित करत विचारले की, “तू राजीवला काय समजावले होते?” (bigg boss 15 shamita shetty gets angry on vishal kotian statements says my family is watching the show)

विशालने दिले स्पष्टीकरण
विशाल आपले स्पष्टीकरण देत म्हणाला की, “मी राजीवला स्टोअर रूमच्या बाहेर समजावून सांगितले होते की, या आठवड्यात तो नॉमिनेट आहे आणि तो तुरुंगात राहिला तर तो जास्त दिसेल.” यावर शमिता म्हणाली, “तुला कसं माहीत त्याला किती एअर टाईम मिळेल.” विशाल म्हणाला, “राजीवने घरात राहावे अशी माझी मनापासून इच्छा होती, पण राजीव त्याचा खेळ खेळू शकला नाही.”

विशालवर भडकली शमिता शेट्टी
शमिता शेट्टी विशाल कोटियनवर संताप व्यक्त करत म्हणाली की, “जर तुला सर्व काही माहित आहे, गेममध्ये काय होणार आहे हेही तुला माहीत आहे, मग तुला वाटले नाही का, की त्याचा व्हीआयपी रूमचा अधिकार काढून घेतला जाईल.” त्यानंतर विशाल म्हणाला की, “मला विचारले आहे, मी उत्तर देतो.” शमिताने सांगितले की, “मी तुला नाही तर बाकीच्या स्पर्धकांना विचारले आहे.”

‘माझे कुटुंब पाहत आहे’
विशालसमोर आपले मत मांडताना शमिता म्हणाली की, “बोलायच्या अगोदर तू अजिबात विचार करत नाहीस की, माझे कुटुंब पाहत आहे. तू म्हणाला, ‘राकेश गेला, हे तिच्यासाठी चांगले आहे, ती आता माझ्यावर अवलंबून असेल.’ ही गोष्ट अजिबात चांगली नाही. माझा प्रियकर आजारपणामुळे बाहेर गेला आणि तू म्हणत आहेस की मी आनंदी आहे, तर तू विचार कर की, कसे वाटेल.”

शमिता शेट्टी पुढे म्हणाली की, “तू तर म्हणाला की, जेव्हा माझी आणि तेजस्वीची निवड करण्याची वेळ येईल, तेव्हा तू तिलाच निवडशील.” यावर उत्तर देताना विशाल म्हणाला की, “तिने माझ्यावर उपकार केल्यामुळे मी बोललो आहे.” शमिता म्हणाली की, ‘मी तुला नेहमीच पाठिंबा दिला आहे, त्याच काही नाही आणि हे अपुन करून माझ्याशी बोलू नको.”

शमिता शेट्टी घरात परतल्यानंतर, खेळ अधिकच रंजक वाटू लागला आहे. आता पुढे काय होईल हे पाहणे रंजक ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटपटांनंतर आता टीव्ही मालिकेत वाजणार सचित पाटीलच्या अभिनयाचा डंका, लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

-विक्रम गोखलेंवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अवधूत गुप्तेची भलीमोठी पोस्ट, म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवून…’

-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!

हे देखील वाचा