Tuesday, July 9, 2024

काय सांगता! कमी टीआरपीमुळे ‘बिग बॉस १५’ होणार बंद? नियोजित वेळेपूर्वीच होईल फिनाले

‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त रियॅलिटी शो आहे, ज्याचा भलामोठा चाहतावर्ग आहे. या शोचा १५वा सीझन सुरू आहे, ज्यामध्ये निर्मात्यांनी अनेक मोठे चेहरे आणले आहेत. सीझन १५ सुरू होऊन आता पाच आठवडे झाले आहेत आणि करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, जय भानुशाली यांसारखे मोठे टीव्ही चेहरे घरात भांडणे आणि मारामारी करत आहेत. परंतु असे असूनही, ‘बिग बॉस’चा हा सीझन चाहत्यांमध्ये जास्त कमाल दाखवू शकत नाहीये. यामुळे शोचा टीआरपी मागील सीझनपेक्षा खूपच कमी होत आहे.

बंद होऊ शकतो शो
या शोची लोकप्रियता दर्शकांमध्ये कमी होत आहे. याच कारणामुळे निर्मात्यांनी आता हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. होय, अनेक बातम्यांनुसार, शोच्या घटत्या टीआरपीमुळे, निर्माते हा सीझन लवकरच संपू देणार आहेत आणि त्याचे नियोजन देखील सुरू झाले आहे. (bigg boss 15 show will end due to low trp finale will be before scheduled time)

घसरत चाललीये टीआरपी
माध्यमातील वृत्तानुसार, सलमानची फी मिळून शोचा बजेट ५०० कोटीपर्यंत पोहचला आहे. तसेच वीकेंडलाही शोला टीआरपी मिळत नाही. गेल्या आठवड्यात शोला फक्त १ टीआरपी मिळाला आणि यामुळे निर्माते नाराज आहेत. अशा परिस्थितीत लवकरच निर्माते शो बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

स्पर्धकांचा बोरिंग खेळ
‘बिग बॉस’चा ग्रँड फिनाले फेब्रुवारी महिन्यात होतो आणि या सीझनचा फिनालेही पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात ठेवण्यात आला होता. पण ज्या प्रकारे निर्मात्यांना या शोचा टीआरपी हवा होता, तशी मिळत नाहीये. त्यामुळे हा सीझन फेब्रुवारीपूर्वी संपेल असे निर्माते ठरवत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा