Tuesday, January 13, 2026
Home टेलिव्हिजन अर्रर्र! अंकितच्या चुगल्यांचा प्रियांकाने घेतला चिखल फेकून बदला, पाहा व्हायरल व्हिडिओ

अर्रर्र! अंकितच्या चुगल्यांचा प्रियांकाने घेतला चिखल फेकून बदला, पाहा व्हायरल व्हिडिओ

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘मध्ये सेलिब्रिटींनी त्यांचे खरे व्यक्तिमत्व लपविण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी शोचे निर्माते अशा अनेक संधी आणतात की, प्रत्येकाचे सत्य समोर येते. शोच्या आगामी एपिसोडमध्येही असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. बिग बॉसने स्पर्धकांना असा टास्क दिला की, सर्वांचे रहस्य उघड झाले आणि त्यानंतर घरातील सदस्यांमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळाली. 

बिग बॉस 16 ( bigg boss 16) च्या निर्मात्यांनी शोच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये बिग बॉसने लॉन परिसरात सर्व स्पर्धकांना एकत्र केले आहे आणि एक टीव्ही सेट केला आहे. टीव्हीवर, बिग बॉसने घरातील प्रत्येक सदस्याचे त्याच्या पाठीमागे केलेल्या चुगल्या प्रदर्शित केल्या. या टास्कमध्ये स्पर्धकांना अंदाज लावायचा होता की, त्यांच्या पाठीमागे कोण गॉसिप करत आहे आणि मग ते त्या स्पर्धकाला बाेलावून त्यांच्या चेहऱ्यावर चिखलफेक करू शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

टास्क दरम्यान, बिग बॉसने प्रियांका चहर चौधरीसाठी एक नोट शेअर केली, ज्यामध्ये लिहिले होते, “ती खेळाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीबद्दल बोलतच नाही, मी तर तिला काहीही बोलू शकत नाही, मी तिला सांगितले तर तिने उत्तर दिले की, मला काहीही सांगू नकोस.” अंकितने प्रियांकाबद्दल सौंदर्याला हे सांगितले होते. हे वक्तव्य पाहून प्रियंका संतापली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

आधी तिने अंकितला बोलावले आणि चिखलाने भरलेली बादली त्याच्या चेहऱ्यावर फेकली, त्यानंतर तिने आपला मुद्दा ठेवला आणि ती असे का बोलत आहे हे सांगितले. जेव्हा सौंदर्याने बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रियंका तिच्यावरही चिडली आणि म्हणाली की, “तू आमच्यात बाेलू नकाेस.”

यानंतर प्रियांका आणि सौंदर्यामध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणांमुळे शाेच्या आगामी भागात काय ट्विस्ट येईल हे पाहण्यासाठी चाहेत फार उत्सूक आहेत.( bigg boss 16 angry priyanka choudhary throws mud on ankit gupta face gets into heated argument)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
आलियाच नाही तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री लग्नाआधीच झाल्या होत्या प्रेग्नंट, यादी पाहाच
लग्न साेहळा! मेहंदी फंक्शनमध्ये हंसिकाने हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत केला जाेरदार डान्स, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा