Thursday, April 25, 2024

आलियाच नाही तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री लग्नाआधीच झाल्या होत्या प्रेग्नंट, यादी पाहाच

लग्नाआधीच प्रेग्नंसीच्या बातम्या बॉलिवूडमध्ये खूपच चर्चेत असतात. अलीकडेच आलिया भट्ट हिने एका मुलीला जन्म दिला आहे. आलिया भट्ट याच वर्षी 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकली हाेती. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर आलियाने तिच्या प्रेग्नंसीची बातमी शेअर केली होती. यावरुन लाेकांनी आलियाला चांगलेच ट्रोलही केले हाेते. मात्र, आलियाच नाही तर अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाआधी प्रेग्नंट झाल्या हाेत्या. काेण आहेत या अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

श्रीदेवी
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीने 1996 मध्ये चित्रपट निर्माता बोनी कपूरसोबत लग्न केले. श्रीदेवीच्या लग्नाच्या वेळीही ती लग्नाआधीच गर्भवती असल्याच्या बातम्या आल्या होत्या. माध्यमातील वृत्तानुसार, लग्नाच्या वेळी अभिनेत्री  7 महिन्यांची गरोदर हाेती. श्रीदेवीची पहिली मुलगी जान्हवी कपूर आहे. हिचा जन्म 1997 मध्ये झाला. मात्र, याबाबत श्रीदेवी कधीच उघडपणे बोलली नाही.

नेहा धुपिया
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया 10 मे 2018 रोजी तिचा प्रियकर अंगद वेदीसोबत लग्न बंधनात अडकली आणि 18 नोव्हेंबर 2018 रोजी नेहाने म्युनिकमध्ये मुलाला जन्म दिला. तेव्हापासूनच नेहा लग्नाआधीच गरोदर असल्याच्या बातम्या सतत येऊ लागल्या.

नीना गुप्ता
अभिनेत्री नीना गुप्ता आज महिलांमध्ये आयकॉनपेक्षा कमी नाही. 80 च्या दशकात नीनाचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत अफेअर होते. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि नीना गरोदर राहिली. पण नंतर विवियनने लग्नाला नकार दिला. मात्र, नीनाने हार मानली नाही आणि मुलीला जन्म दिला. आज या स्टेपसाठी नीनाचे खूप कौतुक होत आहे.

कोंकणा सेन शर्मा
या यादीत अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचेही नाव आहे. लग्नाआधी प्रेग्नंट झालेल्या अभिनेत्रींमध्येही कोंकणाचंही नाव घेतले जातं. कोंकणा सेन शर्माने 2010 मध्ये अभिनेता रणवीर शौरीसोबत लग्न केले. मात्र, नंतर दोघेही वेगळे झाले. कोंकणा सेन शर्माबद्दलही बातम्या आल्या होत्या की, ती लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती. (these bollywood actresses got pregnant before marriage including sridevi, alia bhatt, neha dhupia and neena gupta)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
राेहित शेट्टीच्या सर्कस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दीपिका देणार ‘हे’ भन्नाट सप्राइज
‘गॅस सिलिंडरने बंगालींसाठी मासे शिजवणार का?’, परेश रावल यांचे वादग्रस्त वक्तव्य, मागितली माफी

हे देखील वाचा