Sunday, August 3, 2025
Home टेलिव्हिजन ‘बिग बॉस 16’ मध्ये प्रवेश करताच साजिद खानने केला मोठे खुलासे, ‘या’ वक्तव्याने सर्वजण झाले थक्क

‘बिग बॉस 16’ मध्ये प्रवेश करताच साजिद खानने केला मोठे खुलासे, ‘या’ वक्तव्याने सर्वजण झाले थक्क

टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त रिऍलिटी शो ‘बिग बॉस सीझन 16‘ सुरू झाला आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक साजिद खान देखील शोमध्ये स्पर्धक म्हणून आला आहे. साजिद बराचकाळ चित्रपटसृष्टीपासून गायब होता आणि अचानक बिग बॉस ग्रँड प्रीमियरमध्ये स्पर्धक म्हणून दिसल्यानंतर साजिद खानने सर्वांना आश्चर्यचकित केले. या शोमध्ये आल्यानंतर साजिदने त्याच्या कारकिर्दीतील अपयश आणि वादांविषयी बोलला आहे.

सण 2018 मध्ये #MeToo चळवळीदरम्यान साजिद खान(Sajid khan) याच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. यानंतर साजिद रिऍलिटी शो, फिल्म प्रमोशन, मीडिया आणि इंडस्ट्रीतील शानदार पार्ट्यांमधून गायब झाला होता.

साजिद खान म्हणाला की, “माझ्या यश आणि अहंकाराने मला उद्ध्वस्त केले.” बिग बॉस 16 चा होस्ट सलमान खानशी बोलताना साजिद खानने खुलासा केला की, “अक्षय कुमार, अजय देवगण, जॉन अब्राहम, मिथुन दा, ऋषी कपूर, रणधीर कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांना दिग्दर्शित केल्यानंतर माझ्यात अहंकार आला. माझे चित्रपट चांगले चालत असल्याने मला अभिमान वाटू लागला.” साजिद म्हणाला, “एक म्हण आहे, “अपयश माणसाला बरबाद करते, पण माझ्या बाबतीत यशाने मला उद्ध्वस्त केले.”

साजिद खान पुढे म्हणाला, “जेव्हा मी तीन बॅक-टू-बॅक हिट चित्रपट दिले, तेव्हा मी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिक आहे आणि कधीही चुकीचा चित्रपट बनवू शकत नाही असे मानू लागलाे हाेताे. पण जेव्हा वास्तवाने मला आरसा दाखवला तेव्हा 2013 मधील ‘हिम्मतवाला’ चित्रपट आणि 2014 मधील कॉमेडी-रोमान्स ‘हमशकल्स’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

साजिदने 2019 मधील ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पद सोडण्याबाबतही सांगितले. तो म्हणाला, “हमशकल्स चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मी माझा चेहरा लोकांपासून लपवला, त्यानंतर मी हाऊसफुल 4 लिहायला सुरुवात केली आणि चित्रपटाचा अर्धा भाग दिग्दर्शित केला. रात्रीपर्यंत मी चित्रपटावर काम करत होतो आणि सकाळी अचानक मला चित्रपटातून हाकलून देण्यात आले. या चित्रपटाचे माझे श्रेयही माझ्याकडून काढून घेण्यात आले. मग मला वाटले की, हे देवाचे काही संकेत आहे की, मी एक चांगला व्यक्ती बनलो पाहिजे.”

सादीजवर लैंगिक शोषणाचे होते गंभीर आरोप
सण 2018 मध्ये Metoo चळवळ सुरू झाली. या आंदोलनात महिलांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचार, बलात्कार, विनयभंगाच्या घटना सांगितल्या. त्यानंतर अभिनेत्री सलोनी चोप्रा, रेचेल व्हाइट आणि मंदाना करीमी तसेच पत्रकार करिश्मा उपाध्याय यांच्यासह चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनी दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर साजिद खानला इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने एका वर्षासाठी निलंबित केले होते. साजिदला त्याच्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटातूनही काढण्यात आले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
एकट्या करिनाला विमानतळावर पाहून चाहते झाले ‘अनकंट्रोल’, बेबोची पळताभुई थोडी, कुणी हात धरला तर कुणी…

बापरे..! टायगर श्रॉफला नक्की झालंय तरी काय? व्हिडिओ पाहून चाहते प्रचंड काळजीत, कारणही आलंय समोर

हे देखील वाचा