Monday, February 24, 2025
Home टेलिव्हिजन शालिन भनोटची एक्स पत्नी दलजीत कौर पुन्हा एकदा प्रेमात, ‘या’ व्यक्तीसोबत थाटणार संसार

शालिन भनोटची एक्स पत्नी दलजीत कौर पुन्हा एकदा प्रेमात, ‘या’ व्यक्तीसोबत थाटणार संसार

बिग बॉस 16 चा सर्वधिक चर्चेत असणारा स्पर्धक अभिनेता शालीन भनोट याची पूर्व पत्नी टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. सलमान खनने केलेली भविष्यवाणी खरंच झाली आहे. गेल्या एक वर्षापासून दलजीत युके मध्ये राहाणाऱ्या निखिल पटेलच्या प्रेमात पडली आहे. सध्या सोशल मीडियालर यांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

टिव्ही क्षेत्रामधील सर्वाधिक कॉन्ट्रवर्सीयल कार्यक्रम बिग बॉस 13 (Bigg Boss 13) ची स्पर्ध अभिनेत्री दलजीत कौर (Daljit Kaur) हिने 2009 साली शालिन भनोट (Shalin Bhanot) सोबत लग्न केलं होतं. मात्र, काही काळानंतर यांच्यामद्ये खूप वाद होऊ लागले आणि शेवटी त्यांनी 2015 साली घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तिला पुन्हा एकदा निखिल पटेल (Nikhil Patel) सोबत प्रेम झालं आहे. गेल्या एक वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असून लवकरच हे जोडपं लग्नबंधनातही अडकणार आहे. निखिल युकेमधील एका फायनांन्स कपंनीमध्ये काम करत आहे. त्याशिवाय या दोघांनी (दि, 3 जानेवारी) रोजी गुपचुप साखरपुडा देखिल उरकला आहे. मार्च 2023 मध्ये दलजीत पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार आहे.

दलजीतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान लग्नानंतरच्या प्लॅनिंगबद्दलही सांगितलं आहे. अभिनेत्रीने सांगितले की, “माझं लग्न येत्या मार्चमध्ये होणार आहे, आणि मी अजूनही अनेक गोष्टींची माहिती काढत आहे. मी लग्नानंतर काही वर्षासाठी अफ्रीकामधील नैरोबीला जाणार, कारण निखिलला कामासाठी तिथेच राहावं लागणार आहे. काम संपल्यानंतर आम्ही लंडणला परत त्याच्या घरी येणार आहोत.” सांगायचं झालं तर निक आणि दलजीत दोघांचही हे दुसरं लग्न आहे.

 

View this post on Instagram

 

दलजीत आणि निकची पहिली भेट दुबईमध्ये एका मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यावेळी या दोघांमध्ये फक्त त्यांच्या मुलांबद्दल चर्चा केली होती, तेव्हा दोघांच्याही मनात कोणत्याच प्रकारची प्रेमाची भावना नव्हती. दोघांनाही काळानुसार प्रेम झालं आणि त्यांनी एक वर्षानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 3 जानेवारी रोजी नेपाळमध्ये एकमेकांना अंगठ्या घालून साखरपुडा केला. आणि आता मार्चमध्ये लग्न करण्याचाही निर्णय घेतला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
जेव्हा रफी साहेबांच्या गळ्यातून गाणं गाताना आला होते रक्त, सतत १५ दिवस केला होता रियाज
सलीम खान यांनी सांगितले अरबाज आणि सोहेल यांना बॉलिवूडमध्ये मिळालेल्या अपयशाचे करण

हे देखील वाचा