Friday, January 27, 2023

टीव्हीवरील ‘या’ प्रसिद्ध मालिकांचे नाव ठरवले होते ‘या’ बॉलिवूड गाण्यांवरुन

चित्रपट आणि मालिकांचे नाव जरा हटके ठेवण्यासठी निर्माता आणि दिगदर्शक जिवतोड मेहनत घेत असतात. त्याशिवाय मालिका किंवा चित्रपटाचं नाव त्या कथेशी मिळतं जुळतं असावं आणि प्रेक्षकांच्या लगेच लक्षात राहिल अशी काळजी देखिल घेतली जाते. मालिकेच्या नावातच कथेचा अर्थ लागेल अशी नावं आजकाल बॉलिवूडमधील गाजलेल्या गाण्यांवरुन ठेवली जातात. तर आपण आज अशा मालिका बघणार आहोत ज्याचं नाव बॉलिवूडमधील गाण्यावरुन ठरवण्यात आलं आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है
स्टारप्लसवरील बहुचर्चित मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेची सुरुवात अक्षरा आणि नैतिकच्या नात्यापासून झाली होती. म्हणजेच हिना खान (Hina Khan) आणि करण मेहरा (Karan Mehera) हे कालाकार मुख्य भूमिकेत होते. आता या मालिकेमध्ये कथेपासून ते कालांरापर्यत बदल करण्यात आला आहे. सध्या यामध्ये हर्षद चोपडा आणि राठौड मुख्य भमिकेत असणाऱ्या या निकेचे नाव मिनाक्षीच्या गाण्यावर आधारित आहे.

दीया और बाती हम
स्टारप्लसवरील सर्वाधिक गाजणारी मालिका ‘दिया और बाती हम’ मध्ये दीपिका सिंग (Dipeeka Singh) आणि अनस रशीद (Aanas Rashid) हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. या मालिकेचे नाव अनिल कपूर (Anil Kapoor) स्टारर ‘विरासत’ चित्रपटामधील ‘तारे है बाराती’ या गाण्यावरुन ठरवण्यात आले होते.

इस प्यार को क्या नाम दूं
स्टारप्लवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘इस प्यार को क्या नाम दूं’ मध्ये सनाया इरानी, बरुन सोबती, दलजीत कौर आणि उत्कर्शा नाइक सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी मुख्य भूमिकेत काम केले होते. या मालिकेचे नाव बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर (Tushar Kapoor) ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातील गाण्यामधून घेतले होते.

गुम है किसी के प्यार में
सध्या स्टारप्लसवरील प्रदर्शित कार्यक्रम ‘गुम है किसे के प्यार में’ मधील मालिकेमध्ये अभिनेता आयशा भट्ट आणि नील भट्ट मुख्य भूमिकेत काम करत आहेत. रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांचा चित्रपट रामपुर का लक्ष्मण यामधील गुम है किसके प्यार में या गाण्यावरुन मालिकेचे नाव ठरवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विषये का! 2022मधील सर्वात श्रीमंत अभिनेते, फ्लॉप सिनेमे देऊनही कमावला बक्कळ, ‘हा’ पठ्ठ्या अव्वलस्थानी
‘सिनेमा रिलीज झाला, तर भारत-पाकिस्तानचं नातं सुधारेल’, पाकिस्तानी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

हे देखील वाचा