Monday, July 1, 2024

बिग बॉस १६ फेम शिव ठाकरे अन् अब्दु अडचणीत; ED ने बजावलं समन्स

बिग बॉस १६ फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दु रोजिक (Abdu Rozik) कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी दोघांना ईडीने समन्स बजावले आहे. हे मनी लाँन्ड्रिंग प्रकरण ड्रग लॉर्ड अली असगर शिराजीशी (Ali Asgar Shirazi) संबंधित आहे. या प्रकरणात शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांचे स्टेटमेंट घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अली असगर शिराजीची कंपनी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून अनेक स्टार्टअप्ससाठी निधी देण्यात आला होता. या कंपनीकडून ज्या उद्योगांसाठी पैसे देण्यात आले आहेत त्यात शिव ठाकरेचे ‘ठाकरे फूट अँड स्नॅक रेस्टॉरंट’ आणि अब्दु रोजिकचे रेस्टॉरंट ‘बुर्गिर’ यांचाही समावेश आहे.

अली अगसर शिराजीची कंपनी नार्कोच्या माध्यमातून फंडिंग जमा करत होती. नार्को बिजनेसमध्ये शिराजीचा हात असल्याने शिव ठाकरे आणि अब्दु रोजिकने शिराजीसोबतचे आपले कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोघांची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यात येणार आहे. ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सवर अद्याप शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शिव ठाकरेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘बिग बॉस मराठी’ शो त्याने जिंकला होता. त्याशिवाय बिग बॉस 16 चा तो उपविजेताच ठरला होता. ‘खतरों के खिलाडी 13’ मध्येही शिव ठाकरेने सहभाग घेतला होता. सध्या तो ‘झलक दिखला जा 11’ या शोमध्ये जिंकण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.

न्यूड फोटोंवर विद्युत जमवालने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला त्याचा काहीही फरक पडत नाही’

हे देखील वाचा