Thursday, April 18, 2024

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यात जास्त श्रीमंत कोण? जाणून घ्या दोघांचे नेटवर्थ

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet singh) आज तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहे. ती जॅकी भगनानीसोबत लग्नगाठ बांधत आहे. जॅकी भगनानी हा चित्रपट निर्माता आहे. तसेच रकुल ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या लग्नाची बातमी आल्यापासून चाहत्यांना त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येत आहे. या दोघांमध्ये श्रीमंत कोण हे जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता असते.

रुकुल प्रीत सिंग गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. रकुलने 2009 मध्ये कन्नड चित्रपट ‘गिल्ली’मधून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर तिने साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. रकुल अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. यामध्ये थँक गॉड, छत्रीवाली आणि डॉक्टर जी या चित्रपटांचा समावेश आहे. रकुलच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका चित्रपटासाठी सुमारे 3 ते 4 कोटी रुपये घेते. रिपोर्ट्सनुसार, रकुलची एकूण संपत्ती 49 कोटी रुपये आहे.

जॅकी भगनानीबद्दल सांगायचे तर तो निर्माता वासू भगनानी यांचा मुलगा आहे. जॅकीने आपल्या करिअरची सुरुवात अभिनयातून केली, पण त्याला यश मिळाले नाही. आता तो चित्रपट निर्मितीच्या दुनियेत सक्रिय आहे. जॅकीच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव पूजा फिल्म्स आहे, ज्याच्या अंतर्गत ‘मिशन लाइन’, ‘गणपथ 2’ आणि ‘कठपुतली’ सारखे चित्रपट बनले आहेत. अभिनेता म्हणून जॅकी ‘रेहना है तेरे दिल में’, ‘कल किसने देखा’ आणि ‘फालतू’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. नेट वर्थबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, जॅकी भगनानीची एकूण संपत्ती सुमारे 35 कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या नेटवर्थनुसार असे म्हणता येईल की, रकुल प्रीत सिंग संपत्तीच्या बाबतीत जॅकीच्या पुढे आहे. रकुल आणि जॅकी भगनानी यांची एकूण संपत्ती 84 कोटी रुपये आहे.

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी आज 21 फेब्रुवारीला गोव्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला अनेक स्टार्सनीही हजेरी लावली होती. यानंतर हे कपल मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी ठेवणार आहे. दोघांचे लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भूल भूलैय्या 3 मध्ये कार्तिकसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स
आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ येणार १९ एप्रिलला

हे देखील वाचा