Thursday, April 18, 2024

न्यूड फोटोंवर विद्युत जमवालने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला त्याचा काहीही फरक पडत नाही’

अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) सध्या त्याच्या आगामी ‘क्रॅक: जीतेगा तो जीगा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केले आहेत, जे पाहून प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा उत्साह गगनाला भिडला आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच विद्युत त्याची निर्मितीही करत आहे. त्याचवेळी, आता अभिनेत्याने कपड्यांशिवायच्या त्याच्या फोटोंबद्दल उघडपणे बोलले आहे. यासोबतच त्याने सांगितले की, टीकेने काही फरक पडत नाही.

त्याच्या न्यूड फोटोंबद्दल बोलताना विद्युत म्हणाला, ‘मला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडते. मला अनेकदा स्वतःची कामे करायला आवडतात. मला कंटाळा यायला आवडते, मला उत्तेजित न करणारे पुस्तक वाचायला आवडते. तुम्ही ज्या फोटोबद्दल बोलत आहात तो माझ्या 14 सहलींपैकी एक आहे, मला वाटले की तो पोस्ट का करू नये? मला हे फोटो खूप आवडले, म्हणून मी ते सोशलवर पोस्ट केले. प्रत्येकाने स्वतःसोबत वेळ घालवला पाहिजे, भले ते असेच असले तरी.”

विद्युतला जेव्हा विचारण्यात आले की, त्याच्या न्यूड फोटोंवर होत असलेली टीका त्याला त्रास देते का? तो म्हणाला, ‘या छोट्या गोष्टी म्हणजे डास चावल्यासारखे आहेत. तो असेही म्हणाला की टीका त्याला त्रास देत नाही, कारण ते फक्त त्याच्याबद्दलचे मत आहे.

विद्युतच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर नोरा फतेही, अर्जुन रामपाल आणि एमी जॅक्सन सारखे कलाकार ‘क्रॅक’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनयासोबतच विद्युत जामवालने अब्बास सय्यदसोबत या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. ‘क्रॅक-जीतेगा तो जीगा’ हा आदित्य दत्त दिग्दर्शित स्पोर्ट्स चित्रपट आहे. दोन भावांवर आधारित हा चित्रपट आहे. ‘क्रॅक’ 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यात जास्त श्रीमंत कोण? जाणून घ्या दोघांचे नेटवर्थ
किसींग सीन्समुळे निर्मात्यांनी माझा गैरवापर केला; इमरान हाश्मी असं का म्हणाला?

हे देखील वाचा