Friday, March 14, 2025
Home अन्य चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी समोर येणार ‘बिगबॉस 16’ चा प्रोमो

चाहत्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी समोर येणार ‘बिगबॉस 16’ चा प्रोमो

बिग बॉस या रिअलिटी शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा प्रत्येक सीझन पूर्वीपेक्षा वेगळा असतो, त्यामुळे चाहते उत्सुक असतात. सलमान खानच्या (Salman Khan) शोचा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसच्या या सीझनची थीम एक्वाटिक असणार आहे. काही काळापूर्वी सेटवरील काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सलमानने शोच्या पहिल्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि आता त्याचे चाहते रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या दिवशी बिग बॉस 16 चा पहिला प्रोमो रिलीज होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बिग बॉस 16 चा पहिला प्रोमो डान्स रिअलिटी शो झलक दिखला जाच्या प्रीमियर एपिसोडमध्ये रिलीज होणार आहे. झलक दिखला जा हा सिनेमा पाच वर्षांनंतर कमबॅक करत आहे. त्याच वेळी, बिग बॉसचे निर्माते आता त्याचे प्रोमो प्रदर्शित करणार आहेत.

बिग बॉसचा सीझन 15 टीआरपी लिस्टमध्ये काही खास दाखवू शकला नाही.शोचा टीआरपी काही खास आला नाही. चाहते सीझन 16 कडून खूप अपेक्षा ठेवत आहेत. बिग बॉस 16 मध्ये खरा ड्रामा आणि मसाला पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. डान्स रिअलिटी शो झलक दिखला जा 5 वर्षांनंतर कमबॅक करणार आहे. कलर्स वाहिनीवर ३ सप्टेंबरला हा शो प्रीमियर होणार आहे. या शोला करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही जज करणार आहेत.

झलक दिखला जा मध्ये शिल्पा शिंदे, रुबिना दिलीक, निया शर्मा, फैजल शेख, गश्मीर महाजनी, धीरज धूपर, पारस कालनावट, गुंजन, नीती टेलर, अमृता खानविलकर आणि जोरावर कालरा नृत्य करताना दिसणार आहेत. शोचे अनेक प्रोमो रिलीज झाले आहेत आणि चाहते आता त्याच्या प्रीमियरची वाट पाहत आहेत.

हेही वाचा – ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश
अचानक एक्सिट घेतलेल्या अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?

शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘हे गणराया’ गाणे लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा