अचानक एक्सिट घेतलेल्या अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?


अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची (Sidharth Shukla) रविवारी (१२ डिसेंबर ) पहिली जयंती आहे. सिद्धार्थ आज भलेही आपल्यासोबत नसेल पण आजही तो त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. या वर्षी २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला होता. आज सिद्धार्थची ४१ वी जयंती आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

सिद्धार्थचा जन्म १९८० मध्ये मुंबई येथे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव अशोक शुक्ला आणि आईचे नाव रीता शुक्ला आहे. त्याचे वडील व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर होते, तर आई गृहिणी. त्याला दोन मोठ्या बहिणीही आहेत. त्याचे कुटुंब मुख्यतः उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील. सिद्धार्थने त्याचे शालेय शिक्षण सेव्हियर हायस्कूल फोर्टमधून पूर्ण केले. त्यानंतर त्याने इंटिरिअर डिझायनिंगचा कोर्स केला. अभिनयात येण्यापूर्वी सिद्धार्थला इंटिरियर डिझायनर व्हायचे होते. पण त्याला अभिनयातही रस होता, त्यामुळे त्याने अभिनयात नशीब आजमावायचे ठरवले.

सिद्धार्थने २००८ मध्ये ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या टेलिव्हिजन शोमधून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर सिद्धार्थने ‘ये अजनबी और लव्ह यू जिंदगी’ हा शो केला. २०१२ मध्ये आलेल्या ‘बालिका वधू’ या मालिकेत शिवराज शेखरच्या भूमिकेने सिद्धार्थला इंडस्ट्रीत आणि फॅन्सच्या मनात ओळख मिळवून दिली. २०१३ मध्ये सिद्धार्थने ‘झलक दिखला जा’ या रियॅलिटी शोमध्येही सहभागी होत त्याने त्याच्या डान्सची झलक सर्वांना दाखवली. याशिवाय ‘पवित्र रिश्ता’मध्येही सिद्धार्थने पाहुण्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ ‘फियर फॅक्टर खतरों के खिलाडी ७’ मध्येही दिसला आहे.

सिद्धार्थने चित्रपटांमध्येही काम केले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात त्याने सहाय्यक भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला स्टारडस्ट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सिद्धार्थ बिग बॉस सीझन १३ चा विजेता असून, बिग बॉसच्या घरात सिद्धार्थचे नाव शहनाझ गिलशी जोडले गेले होते. प्रेक्षकांनाही दोघांची जोडी खूप आवडली होती, तेव्हाच दोघांच्या नावाचा ट्रेंड रोज व्हायचा. दोघांनी एकत्र व्हिडिओ अल्बमही केला होता. सिद्धार्थने नुकतीच ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ ही वेबसीरिज केली होती.

मॉडेलिंगमध्ये कमावले नाव

सिद्धार्थने मॉडेलिंगमध्ये देखील हात आजमावला आणि त्याला यात यश सुद्धा मिळाले. २००४ मध्ये ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट’ आणि ‘मेगा मॉडेल कॉन्टेस्ट’मध्ये तो उपविजेता ठरला होता. त्यानंतर तो ‘रेशम का रुमाल’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला, जो इला अरुणने गायला होता. २००५ मध्ये, तिने तुर्कीमध्ये आयोजित ‘वर्ल्ड बेस्ट मॉडेल कॉन्टेस्ट’ जिंकून भारतीयांना अभिमान वाटला. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला आशियाई ठरला आहे.

सिद्धार्थ शुक्ला खेळातही चांगला होता आणि तो त्याच्या शाळेच्या टेनिस आणि फुटबॉल संघाचा एक भाग होता. माध्यमांतील वृत्तानुसार, तो १९ वर्षाखालील फुटबॉल संघाचा देखील एक भाग होता. जो प्रसिद्ध इटालियन क्लब एसी मिलान विरुद्ध मुंबईत आला तेव्हा ‘फेस्टा इटालियाना’ अंतर्गत खेळला होता.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!