Sunday, June 8, 2025
Home टेलिव्हिजन जनतेला खुश करण्याच्या राड्यात शालिन आणि अर्चनाचा झाला तमाशा, डान्स करताना धपकन पडले अन्…

जनतेला खुश करण्याच्या राड्यात शालिन आणि अर्चनाचा झाला तमाशा, डान्स करताना धपकन पडले अन्…

सध्या बिग बॉस 16 चांगलच रंगात आलं आहे. काही दिवसानंतर आपल्या बिग बॉस 16 चा विजेता मिळणार आहे.  प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, निमरित कौर, एम सी स्टॅन, शालिन भनोट, आणि अर्चना गौतम हे सहा स्पर्धक फिनालेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. अशातच दर आठवड्याप्रमानेच या आठवड्यातही नॉमिनेशन प्रक्रिय एकदम हटके पद्धतीने होणार आहे. करण यावेळेस घरातील स्पर्धक नाही तर बाहेरची जनता टॉप 5 ची निवड करणार आहेत. त्यामुळे पुन्हा जनता येणार आणि आपल्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊन निवड करणार आहेत.

नुकतंच बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या शेवटच्या आठवड्याचा प्रोमो कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा प्रोमो पाहिल्यांनतर चाहत्यांमध्ये कोण 5 फायनलिस्ट असणार हे पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये खुपच उत्सुकता लागली आहे. प्रमोमध्ये घरातील प्रत्येकच स्पर्धक स्टेजवर जाऊन त्यांच्यासाठी मत मिळावा म्हणून जनतेला आपल्या गोष्टी पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्चना स्टेजवर जाऊन सगळ्यांना नमस्कार करत म्हणते की, “मी सुरुवातीपासूनच एकटी खेळले आहे.” आणि शिव म्हणतो की, “जनताचं प्रेम पाहिजे.” प्रियंका म्हणते, “येण्यापूर्वीच विचार केला होता की, जे करेल ते मनाने करेल.”

घरामधील आलेली जनताही सगळ्याच स्पर्धकांचं धाडस वाढवते. त्याशिवाय सगळेच स्पर्धक जनतेला पाहून आनंदाने नाचू लागतता. त्यावेळीच शालिन भनोट आणि अर्चना गौतमही डान्स करतात मात्र, डान्स करण्याच्या राड्यामध्ये ते एवढे वेडे होतात की, डान्स करता करताच धपकन खाली पडतात. त्यांना पाहून स्पर्धक आणि आलेली जनता जोर जरात हसतात तेव्हा या क्षणाला प्रत्येकचजन एन्जॉय करतना पाहायला मिळालं.

या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये ज्याला कमी मतदान मिळेल तो स्पर्धक बाहेर होणार. म्हणजेच फिनालेच्या एवढ्या जवळ येऊन त्या स्पर्धकाचा प्रवास इथेच संपणार आहे. अंदाजानुसार यामध्ये शालिन भनोट (Shalin Bhanot) किंवा अर्चना गौतम (Archana Gautam) यांचा प्रवास संपण्याची शक्यता दर्शवली जात आहे. पण हे गुपित येणाऱ्या भागामध्ये समजणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार, ट्विट करत सन्मान केला देशाला समर्पित
शाहरुखने कर्नल लूथराच्या पत्नीसोबतच केलं फ्लर्ट; थेट सोशल मीडियावरच म्हणाला, ‘टॉप सिक्रेट..’

हे देखील वाचा