Tuesday, May 28, 2024

बिचारा अब्दु! बिग बॉसच्या घरात निमरित कौरच्या बॉयफ्रेंडची एंट्री…

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस 16‘ सध्या खूपच चर्चेत आला आहे. यामध्ये खूप धमाकेदार गोष्टी घडत आहेत. शालिन भनोट आणि एमसी स्टॅन यांच्या भांडणानंतर तर घरामध्ये अनेक वाद पाहायला मिळाले. त्यामध्ये सुंबुल तौकीर आणि टीना दत्ता यांच्यामध्ये भलताच वाद त्यामुळे या कर्यक्रमामध्ये काही नाते आहेत जे अजूनही स्थिर नाहीत.

‘बिग बस16’ मध्ये सध्या अनेक वाद होताना आपण पाहिले आहेत मात्र, एमसी स्टॅन (MC Stan) आणि शालिन भनोट (Shalin Bhanot) यांच्या भांडणाने घरातील प्रत्येक सदस्यच हादरला आहे. पण यासगळ्यामध्ये सध्या एक नवीनच बातमी समोर येत आहे, ती म्हणजे घरातील सगळ्यात हुशार आणि चालाक सदस्य निमरित कौर. बिग बगसच्या घरातील पहिली कॅप्टेन बनली होती यामुळे निमरित खूपच चर्चेत आली होती. तिची आणि अब्दुची मैत्रीदेखिल खूप चांगली जमलेली दिसत आहे. यांच्या मैत्रीला घरातील सदस्य देखिल यांच्या जोडीची मस्ती करत चिडवत असतात.

काही दिवसांपूर्वी एका भागामध्ये दाखवले होते की, निमरित कौर डिप्रेशनच्या आहारी जात आहे. त्यामुळे तिला बिग बॉसने कनफेशन रुममध्ये देखिल बोलावले होते. यानंतर तिला शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि स्टॅनने मदतीचा हात देखिल होता आणि आता ती बऱ्यापैकी त्या ग्रुपमध्ये मिसळली आहे. पण आता नुकतंच माहिती समोर येत आहे की, लवकरच बिग बॉसमध्ये तिचा बॉयफ्रेंड माहिर पांधी (Mahir Pandhi) हजेरी लावणार आहे.

 

View this post on Instagram

 

काही दिवसांपासून अभिनेत्री निमरित कौर अहलुवालिया ही माहिर पांधी याला अनेक दिवसापासून डेट करत आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासून निमरित तिचा रुममेट अब्दु याच्यासोबत जास्त जवळीक वाढली आहे. मात्र माध्यमातील वृत्तानुसार अशी बातमी समोर येत आहे की, निमरितचा बॉयफ्रेंड माहिर पांधी लवकरच वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून, निमरितला सपोर्ट करण्यासाठी येऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

या बातमीने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. सगळ्यांना अब्दुची काळजी वाटत आहे. माहिरच्या एंट्री होणार म्हणून अनेक बिग बॉगबॉसप्रेमी निर्मात्याच्या निर्णयामुळे अब्दु रोजिकबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत. हा निर्णय अब्दुसाठी कठोर असल्याचं म्हठलं आहे. सोशल मीडियावर अब्दु आणि निमरितवर कॉमोडी मिम्स व्हायरल होत आहेत

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘एवढा शो-ऑफ कशासाठी?’, आमिर खानची मुलगी साखरपुड्यामध्ये ट्रोल…व्हिडिओ होतोय व्हायरल
एक्स बॉयफ्रेंडने सुश्मिताला दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियावर फोटो होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा