Wednesday, March 27, 2024

‘अरे भय्या इसको बाहर निकाल दो’, अर्चना गौतमच्या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

टिव्ही वरील लोकप्रिय कार्यक्रम बीग बॉस याचा सध्या 16 सीजन सुरु झाला असून आता कार्यक्रम खूपच रंगात आला आहे. थोड्याच दिवसात बिग बॉस16 सिजनचा विजेता मिळणार आहे. त्यामुळे घरातील अनेक सदस्य ट्रॉफी जिंकण्यासाठी जिवतोड मेहनत करत आहेत. मात्र, सोमवार (दि, 26 डिसेंबर) रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये तर अर्चना गौतम हिने हद्दच पार केली. या भागाची व्हिडिओक्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बिग बॉस 16 हा आतापर्यतचा सगळ्यात वेगळा भाग ठरला आहे. यामध्ये सर्कसची थीम असली तरी अनेक धक्कादायक वाद पाहायला मिळाले आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये अर्चना गौतम (Archana Gautam) हिने हद्दच पार केली आहे. आधी तिने शिव ठाकरे (Shiv Thakare) सोबत मारहाण केली त्यामुळे तिला घराबाहेरही काढले होते. मात्र, तिने पुन्हा एकदा तिच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

सगळ्यांनाच माहित आहे की, अर्चनाला राग अनावर झाला की, मग ती कुणाचेही ऐकत नाही. पण येवेळी मात्र, तिने इतरांनाही नुकसान पोहोचवण्याचे कृत्य केलं आहे. अर्चना स्वयंपाक बनवत असता नाविकास मानकतला (Vikas Manaktala) चहा बनवण्यासाठी पणी गरम करायला ठेवतो मात्र, हे पाहून अर्चना खूप चिडते आणि तिला राग अनावर होतो. विकास पणी गरम करत असताना ती त्याला जोरात धक्का देते आणि म्हणते, “इथे चहा बनणार नाही.” अर्चनाने धक्का दिल्यानंतर विकासही खूप चिडतो आणि गॅसवर ठेवलेलं भांड ओढतो तेढ्यात सगळं गरम पाणी विकासच्या अंगावर सांडतं आणि काही शितोडे प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Cahudhary) हिच्या अंगावरही उडतात.

 

View this post on Instagram

 

प्रियंकाच्या अंगावर पाणी उडाल्यानंतर ती खूप चिडते आणि म्हणते “तू वेडी आहेस का?” तर विकास रागाच्या भारात चाहाचं भांड फेकून देतो. त्यावेळी शालिन भनोट (Shalin Bhanot) विकासला सावरतो. कलर्स टीव्हीने ही व्हिडिओ क्लीप त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रमा अकाउंटवर शेअर केली आहे. या व्हिडिओ क्लीपवर प्रेक्षकांनी अर्चनाच्या वगणूकीवर संताप व्यक्त केला आहे. त्याशिवाय तिला घरातून बाहेर काढा असं म्हटलं जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! सेटवरच ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत ढासाळली, नाकातून रक्तस्त्राव अन्…
‘आजच्या पिढीला हे काय झालंय?’ तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर काम्या पंजाबीने व्यक्त केली खंत

हे देखील वाचा